होमपेज › Sangli › विहिरीत पडलेल्या इजाट प्राण्याला दिले जीवदान

विहिरीत पडलेल्या इजाट प्राण्याला दिले जीवदान

Published On: Dec 03 2017 1:27AM | Last Updated: Dec 02 2017 8:35PM

बुकमार्क करा

कसबे डिग्रज ः वार्ताहर  

तुंग आणि खोतवाडी - वाजेगाव (ता. मिरज) येथे विहिरीत पडलेल्या इजाट (मंझाट) या प्राण्याला वनविभाग व प्राणीमित्रांनी  सुखरुपपणे बाहेर काढून जीवदान दिले. तुंग येथील सदाशिव गुरव यांच्या विहिरीत दोन दिवसांपासून इजाट पडले होते. ते जखमी असल्याने त्याला बाहेर पडता येत नव्हते. गावातील श्रीकांत बिरनाळे, शंकर कापसे, तुकाराम कोळी यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु विहीर खोल व पायर्‍या नसल्याने ते शक्य झाले नाही.

तुंग सुधार समितीच्या  सदस्याने वनविभाग व प्राणीमित्र यांना संपर्क करुन याची माहिती दिली. उपवनसंरक्षक हाडा, वनक्षेत्रपाल कोळी, वनपाल एम. एम. वाघमारे, वनरक्षक आर. एस. पाटील  यांच्या मार्गदर्शनात किरण नाईक, पुष्कर कागलकर, सचिन साळुंखे, ॠषीकेश घोरपडे, अवधूत सावंत, इलाई शेख, दिलीप शिगाण्णा या प्राणीमित्रांनी मदत केली. तुंग सुधार समितीचे आनंदा नलवडे, बाळासाहेब गणे, संदीप हराळे यांनी सहकार्य केले.