Fri, Aug 23, 2019 21:40होमपेज › Sangli › करगणी जुगार अड्डा; जयसिंगपूरचा मालक पसार

करगणी जुगार अड्डा; जयसिंगपूरचा मालक पसार

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:14AM
आटपाडी : प्रतिनिधी

करगणी (ता. आटपाडी) येथे शेटफळे रस्त्यावरील आनंदा जाधव यांच्या मळ्यातील जुगार अड्ड्यावर शनिवारी दुपारी विशेष पोलिस पथकाने छापा टाकला. या छाप्यात 22 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दीड लाखांची रोकड, 20 मोबाईल, 16 मोटारसायकल, पत्त्याची पाने असा 10 लाख 1 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, या जुगार अड्ड्याचा जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील मालक संदीप चौगुले पसार झाला आहे. 

याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. करगणी येथे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशानुसार विशेष पोलिस पथकाने ही कारवाई केली. विशेष पोलिस पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना करगणीच्या जाधव मळ्यात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला. जयसिंगपूर येथील संदीप चौगुले आणि करगणीचे सोमनाथ श्रीरंग सरगर, 

अशोक कोंडीबा सरगर हे भागीदारीत आनंदा जाधव यांची खोली भाड्याने घेऊन जुगार अड्डा चालवत होते. संदीप कला व सांस्कृतिक मंडळ जयसिंगपूर या नावाखाली मंडळ चालू असल्याचा दिखावा करत प्रत्यक्षात मात्र बेकायदा जुगार अड्डा सुरू असल्याचे छाप्यात उघडकीस आले.

सोमनाथ श्रीरंग सरगर (वय 35), अशोक कोंडीबा सरगर (वय 45), छगन राजाराम लांडगे (वय 35), जमीर बादशाह मुल्ला (वय 38), उत्तम काशिनाथ चव्हाण (वय 33), लक्ष्मण राजाराम लांडगे (वय 48),रामचंद्र दादू कांबळे (वय 45), भारत तानाजी पवार (वय 33),आबा बबन पवार (वय 32),रमेश शामराव नांगरे (वय 45), तानाजी सोपान कांबळे (वय 35), राजू द्वारकानाथ पवार (वय 38), बिरुदेव विठ्ठल टोणे (वय 23), लॉयन लक्ष्मण मंडले (वय 30), सर्जेराव भीमराव मंडले (वय 34), तानाजी भीमराव कांबळे (वय 52, सर्वजण रा.  क रगणी), तुषार सर्जेराव गंभीर (वय 34,रा.काळेवाडी), नंदकुमार पितांबर दबडे (वय 45), पांडुरंग उत्तम जगदाळे (वय 30, दोघेही रा.गोमेवाडी), दिलीप नामदेव मंडले (वय 51), संतोष धोंडीराम गिड्डे (वय 35, दोघेही रा.तडवळे), महिपती सिदा आलदर (वय 50, रा.कोळे,ता. सांगोला, जि.सोलापूर) या 22 जणांना पोलिसांनी अटक केली. 

जुगार अड्ड्याच्या जागेचा मालक आनंदा जाधव आणि संदीप चौगुले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि संतोष डोके यांच्यासह मारुती मोरे, दीपक ठोंबरे, मुदस्सर पाथरवट, प्रशांत माळी, सुहेल कार्तियान, सचिन जाधव, बजरंग शिरतोडे, प्रियांका धुमाळ, ज्योती चव्हाण, गुंडाविरोधी पथकाचे मेघराज रुपनर, सचिन कुंभार, वैभव पाटील, मोतीराम खोत, संतोष गळवे यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, शनिवारी ही मोठी कारवाई झाल्यानंतर तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. राजकीय मंडळींना जुगार खेळताना अटक झाल्याने त्यांची नावे वगळण्यासाठी राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मध्यरात्री जुगार छापा प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

जुगार्‍यात सरपंचाचाही समावेश

दरम्यान करगणी येथील या जुगार अडड्यावर अटक केलेल्यांमध्ये गोमेवाडीचे सरपंच नंदकुमार दबडे आणि करगणीचे ग्रामपंचायत सदस्य अशोक सरगर यांचा समावेश आहे. या जुगार अड्ड्यावर अन्य काही प्रतिष्ठित जुगार खेळण्यासाठी येत असल्याचीही चर्चा आहे.