Wed, Apr 24, 2019 21:33होमपेज › Sangli › कांचनपूरच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू

कांचनपूरच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 12:11AMकुपवाड : वार्ताहर 

तासगाव-मिरज रस्त्यावर तानंग (ता. मिरज) येथील बसस्थानकाजवळ  कांचनपूरहून मिरजेकडे मोटारसायकलवरून जाणारे  संतोष बाबासाहेब कदम (वय35, रा.कांचनपूर, ता. मिरज) यांना  कारने पाठीमागून  ठोकरले. त्यामुळे त्यांचा  मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  कदम  मोटारसायकलवरून मिरजेकडे जात होते. तानंग गावाजवळ मोटारसायकलला पाठीमागून भरधाव वेगाने येणार्‍या कारने जोरदार धडक दिली. त्यामुळे ते  गंभीर जखमी झाले. त्यांना मिरजेतील शासकीय  इस्पितळामध्ये दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली  आहे.