Thu, Jun 20, 2019 01:55होमपेज › Sangli › कडेगावात दारूबंदी चळवळीतील महिलांना धमकावण्याचा प्रयत्न

कडेगावात दारूबंदी चळवळीतील महिलांना धमकावण्याचा प्रयत्न

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 11:58PM

बुकमार्क करा

कडेगाव : शहर प्रतिनिधी

कडेगाव येथील दारूबंदी चळवळीतील महिलांना आणि ग्रामस्थांना दारू दुकानदारांकडून दमदाटी करणे, धमकावणे, चार चाकी वाहन अंगावर घालणे असे प्रकार होऊ  शकतात. त्यामुळे दारूबंदी करण्यासाठी चळवळीतील काम करणार्‍या महिलांच्या  जिवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचे निवेदन  दारूबंदी चळवळीतील महिला व ग्रामस्थांनी कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी यांना दिले आहे.    

कडेगावात  दारूची बाटली आडवी करण्याच्या उद्देशाने महिलांनी पुन्हा एल्गार सुरू केला आहे.  तब्बल चार हजार सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजय-काळम पाटील यांना देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने महिलांनी गावांत जनजागृती  सुरु करून सह्यांची मोहीम जोमाने सुरू केली आहे. 

दारूबंदी  यशस्वी होऊ, नये म्हणून दारू दुकानदारांनी सर्वच प्रकारचे  प्रयत्न सुरु  केले  आहे. त्यामुळे चळवळीत काम करणार्‍या महिला, ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.त्याबाबत दारूबंदी चळवळीतील महिला आणि कार्यकर्त्यांनी कडेगाव पोलिसात निवेदन दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, कडेगाव शहरामध्ये दारूबंदी बाबत सह्यांची मोहीम व प्रबोधन कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे दारू परवाना धारकांकडून या चळवळीत काम करणार्‍या महिला व पुरुषांना संबधित परवाना धारकाकडून हस्ते-परहस्ते धमकावणे, दम देणे, चारचाकी वाहन अंगावर घालणे असे प्रकार होत आहेत. या निवेदनावर संजीवनी संतोष डांगे, कविता अनिल जरग, अश्‍विनी मानव  परदेशी , सुलोचना  सुखदेव मोरे, चिमाताई जाधव, दत्तात्रय शंकरराव देशमुख, सुनील तुकाराम पवार, सुनील वसंत मोहिते, प्रकाश वसंतराव गायकवाड, विठ्ठल शिवाजी खाडे यांनी सह्या केल्या आहेत.