Wed, Jul 24, 2019 12:41होमपेज › Sangli › कदम कुटुंबीयांचे मान्यवरांकडून सांत्वन 

कदम कुटुंबीयांचे मान्यवरांकडून सांत्वन 

Published On: Mar 12 2018 1:07AM | Last Updated: Mar 11 2018 11:36PMकडेगाव : शहर प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह राज्यातील विविध नेत्यांनी रविवारी डॉ. पतंगराव कदम यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. डॉ. कदम यांच्यावर  प्रेम करणार्‍या राज्यभरातील हजारो  कार्यकर्त्यांचा सोनसळ येथे ओघ वाढला आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 12) डॉ. कदम यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता  सोनहिरा कारखान्याच्या कार्यस्थळावर होणार आहे. या कार्यक्रमासाठीही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 

डॉ. कदम यांचे शुक्रवारी मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. 10) वांगी (ता. कडेगाव) येथे लाखोंच्या जनसागरच्या साक्षीने अंत्यविधी करण्यात आला. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर राज्य व देशातील शिक्षण, सहकार, साहित्य, राजकीय, उद्योग क्षेत्रांतील मान्यवरांनी कदम यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून श्रद्धांजली वाहिली. रविवारी 

डॉ.विश्‍वजित कदम, आमदार मोहनराव कदम,विजयमाला कदम यांची  ज्येष्ठ नेते नारायण राणे, विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराती, आमदार अमित झनक, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, माजी आमदार सुभाष कोरपे, आमदार जयकुमार गोरे, साताराचे पोलिस प्रमुख संदीप पाटील, चितळे उद्योग समुहाचे काकासाहेब चितळे, माजी जि.प.सदस्य सम्राट महाडिक, सांगलीच्या नगरसेविका रोहिणी पाटील, सांगली अर्बन बँकचे गणेश गाडगीळ, विट्याचे माजी नगराधक्ष वैभव पाटील, साताराचे योगेश जगताप, बाबासो पाटील-सरुडकर, माजी पोलिस महानिरीक्षक खंडेराव शिंदे यांनी भेट घेतली. तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील  नागरिकानी सांत्वन केले. राज्यभरातून सोनसळकडे येणार्‍या कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे.