Fri, Mar 22, 2019 07:43होमपेज › Sangli › दोन चिमुरड्यांसह मातेची आत्महत्या

दोन चिमुरड्यांसह मातेची आत्महत्या

Published On: Dec 01 2017 11:47PM | Last Updated: Dec 01 2017 11:40PM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : प्रतिनिधी

कोंडिग्रे येथे विहिरीत दोन लहान मुलांसह महिलेचा मृतदेह आढळला. सौ. माधवी संजय कांबळे (वय 26), मुलगा आर्यन (11), मुलगी विदिशा (8) अशी मृतांची नावे आहेत. या महिलेने दोन मुलांसह आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास सुनील पाटील हे शेतातील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेल्यावर त्यांना या तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. 29 नोव्हेंबरपासून सौ. कांबळे या दोन मुलांसह बेपत्ता झाल्या होत्या. पती संजय आण्णाप्पा कांबळे (31) याने तिघे बेपत्ता झाल्याची वर्दी जयसिंगपूर पोलिसात दिली होती.

प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक सई भोरे-पाटील, पोलिस उपनिरीक्षक पूनम माने, किरण दीडवाघ व पोलिस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. संजय 
यांचे मावसभाऊ राहुल कांबळे यांनी वर्दी दिली आहे.  मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच सौ. माधवी यांच्या आई व अन्य नातेवाईक महिलांनी घटनास्थळी धाव घेतली. आईने मुलगी व नातवांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला.