Fri, Aug 23, 2019 14:52होमपेज › Sangli › जत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान

जत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 11 2017 12:01AM

बुकमार्क करा

जत : प्रतिनिधी

जत नगरपालिका निवडणुकीत अतिशय चुरशीने सुमारे 75.55 टक्के मतदान झाले. वीस  नगरसेवक व नगराध्यक्षांच्या थेट निवडीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप या तीनही पक्षांनी विजयासाठी दावा केला आहे.

रविवारी 33 मतदान केंद्रावर मतदान  झाले. आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी सकाळी शहरात मतदानाचा हक्‍क बजावला.

काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीत तिरंगी सामना असल्याने अत्यंत चुरस असल्याचे चित्र दिसून आले. मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मोठी गर्दी व तणावाचे वातावरणही होते. शेवटच्या टप्प्यातही मतदानास वेग आला होता. शिवाजी पेठेत मोठी गर्दी झाली होती. पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे, पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्यासह  पोलिस शहरात गस्त घालत होते.  किरकोळ वादावादीच्या काही  घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या शबाना इनामदार, भाजपच्या डॉ. रेणुका आरळी व काँग्रेसच्या शुभांगी बन्‍नेनवर यांच्यात चुरशीची लढत आहे. तीनही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. सर्व प्रभागांची एकाचवेळी मतमोजणी होणार आहे.