Wed, Jan 23, 2019 02:20होमपेज › Sangli › अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर, 6 ब्रास वाळू जप्त

अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर, 6 ब्रास वाळू जप्त

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 12:01AMजत: प्रतिनिधी

जत पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांविरूध्द जोरदार मोहीम उघडली आहे. बुधवारी रात्री वाळूची चोरटी वाहतूक करणारा एक डंपर  पोलिसांनी पकडला. त्यामधील 6 ब्रास वाळूसह सुमारे 25 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कल्लाप्पा कांबळे व शिवाप्पा माळी या दोघांना ताब्यात घेतले आहे.

 पोलिसांनी वाळू चोरी विरोधात जोरदार मोहिमेसाठी खास पथक तैनात केले  आहे. पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी शिवाजी चौक येथे वाळूची चोरटी वाहतुक करताना डंपर  ( एमएच-10 सीआर 595) पकडला. त्यामध्ये सहा ब्रास वाळूसाठा होता. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.