Tue, Nov 13, 2018 08:03



होमपेज › Sangli › भाजपमध्ये गेलेल्यांवर पश्‍चातापाची वेळ येणार

भाजपमध्ये गेलेल्यांवर पश्‍चातापाची वेळ येणार

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 01 2018 9:56PM



मिरज : प्रतिनिधी

भाजपकडून भेटवस्तू आणि पॅकेज मिळाल्याने काँग्रेसमधील काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांना महापालिका निवडणुकीनंतर पश्‍चाताप करण्याची वेळ येईल. असे माजी मंत्री,आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, भाजपचे मंत्री सांगतात भेटवस्तू वाटा, आणि निवडणूक जिंका त्याच प्रमाणे भेटवस्तु व निवडणुकीसाठी फंड मिळाल्याने काहींनी भाजपमध्ये उडी घेतली आहे. परंतु निवडणुकीनंतर त्यांना पश्च्याताप करण्याची वेळ येणार आहे. भाजपकडे मनपा निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार नसल्याने पैसे देऊन इतर पक्षातील आयते उमेदवार आयात करुन निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. परंतु सांगली, मिरज आणि कुपवाडमधील मतदार काँग्रेसच्या पाठीशी ठाम असून महापालिकेत पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मतदारांच्या मनात काँग्रेस आहे. त्यामुळे आमची पुन्हा सत्ता येण्यास कोणतीही अडचण नाही.

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या काहींनी विकासकामांसाठी काँग्रेसमध्ये निधी मिळत नव्हता असे वक्तव्य केले आहे. त्यांचा  समाचार घेताना. आ.   पाटील म्हणाले, पदाधिकारी तुम्हीच होता. एकीकडे पदे उपभोगता आणि दुसरीकडे निधी मिळत नाही असे सांगता. जर निधी मिळत नव्हता तर त्यावेळी काही झोपला होता काय? आम्ही महापालिकेसाठी किती निधी दिला. हे कोणत्याही स्टेजवर येऊन सांगण्यास तयार आहोत. तुम्ही ज्या पक्षात गेला आहात त्या पक्षाचे कतृत्व काय आहे? हे आधी पहा. मग आमच्यावर टीका करा. असा सल्लाही आ. पाटील यांनी दिला.मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करण्याबाबत विचारविनीमय सुरू असून येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल. उमेदवार निवड करताना स्थानिक नेत्यांशी विचार विनीयम करुनच निर्णय घेतला जाणार आहे.