Mon, Jul 13, 2020 00:54होमपेज › Sangli › सांगली : विट्यात दिवसभर पावसाच्या हलक्या सरी

सांगली : विट्यात दिवसभर पावसाच्या हलक्या सरी

Last Updated: Jun 03 2020 3:14PM

विट्यातील दिवसभरातील वातावरणविटा (सांगली) : पुढारी वृत्तसेवा

विट्यात आज सकाळपासूनेच ढगाळ वातावरण होते. तसेच अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडत आहेत. मात्र सातत्याने सोसाट्याचा वादळी वारा जोराने वाहत आहे.

'निसर्ग' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आज पहाटेपासूनच सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडत आहे. याठिकाणी पहाटेच्या दरम्यान ताशी ५० ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली. येथे हलक्या प्रमाणात पाऊसाच्या सरी कोसळल्या. 

या दरम्यान सकाळी आठच्या सुमारास वाऱ्याचा वेग कमी झाला. अंधारमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी पाऊस कमी झाला. मात्र एकच्या सुमारास वाऱ्याचा वेग पुन्हा वाढला. सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण असून ६ किलोमीटरपर्यंत दृश्यमानता आहे. तसेच २४ अंश सेंटिग्रेड तापमान असून हवेत गारवा आहे.  शिवाय येथे ८७ टक्के आर्द्रता आहे.