Sat, Aug 24, 2019 19:25



होमपेज › Sangli › इस्लामपूर पालिकेवर उरुणाचेच वर्चस्व

इस्लामपूर पालिकेवर उरुणाचेच वर्चस्व

Published On: Dec 03 2017 1:27AM | Last Updated: Dec 02 2017 8:17PM

बुकमार्क करा





इस्लामपूर : मारूती पाटील

इस्लामपूर नगरपालिकेच्या स्थापनेपासून पालिकेवर उरुणाचेच वर्चस्व राहिले आहे. आत्तापर्यंत झालेल्या 27 नगराध्यक्षांपैकी 17 नगराध्यक्ष उरुणातीलच झाले आहेत.  विद्यमान  नगरमंडळातही  नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांसह 28 पैकी 13 व स्वीकृत 1 असे 14 नगरसेवक उरुणातीलच आहेत. 

उरुण-इस्लामपूर म्हणून परिचित असलेल्या इस्लामपूरचे मूळ नाव उरुण. त्यानंतर या शहराचा पश्‍चिमेकडे विस्तार वाढत गेला व उरुणाचे उरुण-इस्लामपूर झाले. सध्या या शहराची लोकसंख्या 67 हजार 315 आहे. 164 वर्षांचा इतिहास असलेल्या  नगरपालिकेची स्थापना 18 नोव्हेंबर 1853 साली झाली. मात्र पालिकेच्या नोंदीत 1909 पासून नगराध्यक्षांची कारकीर्द आहे. आजपर्यंत या नोंदीनुसार 27 नगराध्यक्ष झाले. शहराचे पहिले नगराध्यक्ष कृष्णाजी देसाई होते. 

त्यांच्यानंतर श्रीपाद वैद्य, दिवाणबहादूर मोमीन, बापूसाहेब मठकरी, बाबुराव पाटील, ज्ञानू पाटील, एम. डी. पवार, विजयभाऊ पाटील, अ‍ॅड. सुधीर पिसे, शकुंतला माळी, आनंदराव मलगुंडे, भगवानराव पाटील, अशोकदादा पाटील, प्रा. अरुणादेवी पाटील, शारदा पाटील व विद्यमान नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे उरुणातील नगराध्यक्ष झाले. कृष्णाजी देसाई यांच्यानंतर बळवंत मंत्री, यशवंतराव पाटील, गणपती कपाळे, महादेव कोरे, अ‍ॅड. एस. डी. सांभारे, वाय.एस. जाधव, मुनीर पटवेकर, अ‍ॅड. चिमण डांगे, सुभाष सूर्यवंशी हे इस्लामपूर शहरातील नगराध्यक्ष  झाले. 

मूळ उरुणातील असलेले संग्राम पाटील, शकील सय्यद, आनंदराव पवार, सुप्रिया पाटील, विक्रम पाटील, वैभव पवार हे शहरातील प्रभागातून निवडून आले आहेत. उरुणातील प्रभागातून  उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, मनीषा पाटील, आनंदराव मलगुंडे, सुनीता सपकाळ, शहाजीबापू पाटील, संगीता कांबळे, प्रदीप लोहार, सीमा पवार हे नगरसेवक निवडून आले आहेत.  स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधव हेही मूळचे उरुण परिसरातीलच आहेत.