Sun, Jul 21, 2019 16:11
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › टोमॅटो एफएमवरील बाबुराव साधणार कस्तुरी महिलांशी संवाद

टोमॅटो एफएमवरील बाबुराव साधणार कस्तुरी महिलांशी संवाद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : प्रतिनिधी

मनोरंजनाबरोबरच कला कौशल्य, मार्गदर्शन, प्रशिक्षण, मोठमोठ्या व्यक्तींच्या भेटी...गप्पा...अनुभवांची देवाण-घेवाण यासह आनंदाने आत्मविश्‍वास देत कस्तुरी क्लबने सभासदांच्या मनात घर केले आहे. कस्तुरीच्या महिलांशी संवाद साधण्यासाठी आष्टा येथे शुक्रवार, दि. 1 रोजी टोमॅटो एफएमवरील बाबूराव येणार आहेत. हा कार्यक्रम विलासराव शिंदे हायस्कूलच्या पटांगणात दुपारी 3 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचा आष्टा परिसरातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कस्तुरी क्लबच्यावतीने केले आहे. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, माजी आ. विलासराव शिंदे व माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले आहे. कार्यक्रमात सहभागी होवून सभासद होणार्‍या महिलांसाठी राधे-कृष्णा सारीज्चे मालक बकसाराम चौधरी यांच्यावतीने लकी ड्रॉ काढून विजेत्या 5 महिलांना डिझाईनर साड्या दिल्या जाणार आहेत. 750 रुपयांची नॉनस्टीक कडई आणि इस्लामपुरातील 5999  रुपयांची विविध कुपन आपल्या सभासदांना मिळणार आहेत.

 आष्टा या ठिकाणी सभासद नोंदणीदरम्यान टोमॅटो एफएमवरील बाबूराव यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी हितगुज साधण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तर मग चला...दै. पुढारीच्या कस्तुरी क्लब इस्लामपूर सोबत आष्ट्यामध्ये धमाल करायला. सभासद व कार्यक्रमाच्या माहितीसाठी वैशाली साळुंखे- 9766050840 व सुनीता घोरपडे-9422755512, समीना मुलाणी-8999941748 (सर्व आष्टा) तसेच कस्तुरी को-ऑर्डीनेटर मंगल देसावळे-02342-222333, 8830604322, 8805023883 वर  संपर्क साधावा.