Wed, Jun 26, 2019 17:55होमपेज › Sangli › इस्लामपूर रस्ता कामाचे रिकॉल टेेंडर

इस्लामपूर रस्ता कामाचे रिकॉल टेेंडर

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 10:30PMकवठेपिरान : संजय खंबाळे 

सांगली - इस्लामपूर राज्यमार्गाच्या वाळवा फाटा ते सांगलीवाडी टोलनाका या दरम्यानच्या दुरुस्ती कामाचे रिकॉल टेंडर काढण्यात आले आहे. लवकरच या कामाला प्रारंभ होईल, असे सांगण्यात आले. डिसेंबर 2017 मध्ये हा राज्यमार्ग  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आला. मात्र रस्त्यामागचे दैन्य काही संपले नाही. सांगली - इस्लामपूर राज्यमार्गाची  अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.  या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत  अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनदेखील  किरकोळ अपघाताची मालिका सुरूच आहे. लोकप्रतिनिधी मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोेप वाहनचालक आणि प्रवाशांतून होत आहे. 

या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. काही महिन्यांपासून या मार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत.  लक्ष्मी फाटा, कसबे डिग्रज, तुंग फाट्याजवळ तर रस्त्याची चाळणच झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे प्रवासीवर्गातून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

सांगली - इस्लामपूर हा राज्यमार्ग डिसेंबरमध्ये राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग करण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी 12 कोटींची निविदाही काढण्यात आली. जवळपास 4 महिने होत आले तरीही अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे या परिसरातील  संघटनांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

सांगली - पेठ रस्ता सांगली शहराला जोडणारा प्रमुख मार्ग  मानला जातो. याच रस्त्यावरून सांगली बाजारपेठेत आयात व निर्यात केली जाते. त्यामुळे या मार्गावर दिवस - रात्र वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.  पण रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने अपघात होत आहेत.  प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे कानाडोळा का केला आहे, असा सवाल वाहनधारक करत आहेत. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक करत आहेत.

Tags : sangli, sangli news, Islampur road work, Recall tender,