होमपेज › Sangli › इस्लामपूर-आष्ट्यात उद्या हळदी-कुंकू

इस्लामपूर-आष्ट्यात उद्या हळदी-कुंकू

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 19 2018 8:37PMइ्ल‍इस्लामपूर : प्रतिनिधी

मकर संक्रातीचे औचित्य साधून  दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्यावतीने महिलांसाठी इस्लामपूर येथील वारणा बझारमध्ये रविवारी (दि. 21) रोजी पाककृती स्पर्धा सकाळी 10 ते 11 व हळदी-कुंकू समारंभ दुपारी 3 वाजता होणार आहे. आष्टा येथे हळदी-कुंकू समारंभ त्याच वेळेत होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम कस्तुरी क्‍लब व वारणा बझारच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.  इस्लामपूर येथील मार्केट यार्ड परिसरातील कमानीजवळील बहे नाका येथील वारणा बझार तर आष्टा येथे चौंडेश्‍वरी मंदिराशेजारी वारणा बझारच्या शाखेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

प्रत्येक स्पर्धकाने गोड व तिखट पदार्थ तयार करून आणून या स्पर्धेत सहभागी होता येईल. याच दिवशी अनुक्रमे नंबर काढून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस दिले जाणार आहे. तसेच कस्तुरी सभासदांना कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून तांदळापासून बनविलेले पदार्थ  स्पर्धेस आणणे बंधनकारक आहे. दरम्यान, याच दिवशी दुपारी 3 वाजता हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. महिलांना वारणा बझारकडून वाण देण्यात येणार आहे. कस्तुरी सभासदांनी हळदी-कुंकवास येताना ओळखपत्र घेऊन येणे आवश्यक आहे.  पाककृतीची मांडणी चांगल्या पध्दतीने करून आणावी व केलेल्या साहित्य व कृतीची माहिती लिहून ठेवावी.