होमपेज › Sangli › वाळव्या त परिवर्तनासाठी तयारीला लागा

वाळव्या त परिवर्तनासाठी तयारीला लागा

Published On: Jan 20 2018 1:41AM | Last Updated: Jan 19 2018 9:15PMइस्लामपूर : वार्ताहर

सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करूया. भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. वाळवा विधानसभा मतदार संघात परिवर्तनाचे ध्येय ठेवून सवार्र्ंनी कामाला लागावे, असे आवाहन आमदार शिवाजीराव नाईक यांनी केले. वाळवा तालुका भाजप कार्यकारिणीच्या निवड कार्यक्रमात ते बोलत होते. पक्षाचे  जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सरचिटणीस मकरंद देशपांडे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विक्रम पाटील, वैभव शिंदे, रणधीर नाईक आदी उपस्थित होते. यावेळी सुमारे 150 जणांची जंबो कार्यकारणी जाहीर करण्यात आली. 

आमदार नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उंचावली आहे. विरोधकांकडे आता काहीच मुद्दे नसल्याने लोकांना भडकवून ते आंदोलन करीत आहेत.  पृथ्वीराज देशमुख म्हणाले, जिल्ह्यात पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. पक्ष एकसंघपणे निवडणुकीला सामोरा जाणार आहे. जिल्ह्यातील पाणी योजनांत कोणतेही राजकारण  न आणता सर्वजण या योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.    भगवानराव साळुंखे म्हणाले, नव्या पदाधिकार्‍यांनी संधीचे सोने करावे. भाजप सरकारने केलेले काम शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवावे. मकरंद देशपांडे म्हणाले, पक्षात नव्यांना संधी देताना जुन्यांचाही सन्मान राखला जाईल. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, जुना- नवा मेळ घालत सर्वसमावेशक कार्यकारिणी निवडण्याचा प्रयत्न केला आहे. इस्लामपूर नगरपालिकेप्रमाणेच  विधानसभा निवडणुकीत परिवर्तन होऊन भाजपचा आमदार निवडून येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विक्रम पाटील म्हणाले, तालुक्यात राष्ट्रवादीला शह देण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करूया. वैभव शिंदे म्हणाले, पक्षवाढीसाठी जुना- नवा वाद बाजूला ठेवावा. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, तालुक्यात पक्षवाढीसाठी सर्वांना बरोबर घेऊन काम केले जाईल. स्वरूपराव पाटील, विजय कुंभार, नगरसेविका कोमल बनसोडे, मंगल शिंदे, आशा पवार, सयाजी पवार, जयकर पाटील, धैर्यशील मोरे, धनंजय रसाळ उपस्थित होते. चंद्रशेखर तांदळे यांनी आभार मानले.