Wed, May 22, 2019 14:20होमपेज › Sangli › पेठ-सांगलीच्या कंत्राटदाराला नोटीस काढा

पेठ-सांगलीच्या कंत्राटदाराला नोटीस काढा

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 11:53PM

बुकमार्क करा

इस्लामपूर ः वार्ताहर

पेठ-सांगली रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला नोटीस काढा, असा आदेश कृषी  राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कसलेही सहकार्य होत नसल्याबद्दल ना. खोत यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले.

येथील राजारामबापू नाट्यगृहात ना. खोत यांच्या उपस्थितीत शासकीय विभागाच्या कामकाजाची आढावा बैठक पार पडली. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार नागेश पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, माजी आ. भगवानराव साळुंखे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भास्कर कदम, अरुण कांबळे, सागर खोत उपस्थित होते.  आढावा बैठकीला गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांना नोटीस काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रांताधिकार्‍यांना केल्या. काही विभागाच्या अधिकार्‍यांनी निधी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या.  तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांचा कार्यक्रम  तातडीने हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी तहसीलदारांना केल्या.

या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कसलेही सहकार्य होत नसल्याबद्दल ना. खोत यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्यांना धारेवर धरले. पेठ-सांगली रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला नोटीस काढा, असा आदेशही त्यांनी बांधकाम विभागाला दिला. बी.जी. पाटील यांनी जळालेले मीटर, ट्रान्सफॉर्मर वेळेवर मिळत नाहीत.  तसेच शॉर्ट सर्किटने जळालेल्या उसाची भरपाईही मिळत नसल्याचे सांगितले. यावर ना. खोत यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना तातडीने जळालेल्या उसांचे पंचनामे करून प्रस्ताव देण्याचे आदेश दिले.