Sat, Jul 20, 2019 09:03होमपेज › Sangli › इस्लामपुरात २४, २५ रोजी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन

इस्लामपुरात २४, २५ रोजी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन

Published On: Dec 09 2017 1:46AM | Last Updated: Dec 08 2017 9:49PM

बुकमार्क करा

इस्लामपूर : वार्ताहर

19 वे    राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन इस्लामपूर येथे 24 व 25 डिसेंबरला होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली. या संमेलनाचे अध्यक्ष  उद्धव कानडे तर उद्घाटक अ‍ॅड. भास्कर आव्हाड  आहेत.  केबीपी कॉलेजच्या प्रांगणात  होणार्‍या संमेलनाचे उद्घाटन  ज्येष्ठ साहित्यिक कवी अ‍ॅड. भास्कर आव्हाड यांच्या हस्ते होणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव सरोज पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव, प्रा. रा.ग. जाधव यांना साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  डॉ. रझिया पटेल यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. डॉ. अरुण आंधळे, डॉ. अशोककुमार पगारीया, अ‍ॅड. अनिल गोरखे विचार व्यक्त करणार आहेत. माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, अनुजा कल्याणकर यांना पुरस्काराने  सन्मानित करण्यात येणार आहे. माजी मंत्री आ. जयंत पाटील, अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. 

सोमवारी कवि चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. वैशाली जौंजाळ यांचा एकपात्री प्रयोग व डॉ. रामचंद्र देखणे यांची  मुलाखत होणार आहे. एम.डी. पवार पीपल्स बँकेस पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार  आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, साहित्यिका डॉ. अश्‍विनी धाेंंगडे यांना भाई वैद्य व साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्याहस्ते राष्ट्रीय बंधुता पुरस्कार देण्यात येणार  आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र भारती, शहाजी पाटील, प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, प्रा. एकनाथ पाटील आदी यावेळी उपस्थित होते.