Tue, Jul 16, 2019 22:19होमपेज › Sangli › इस्लामपूर पालिकेची सभापती निवड बिनविरोध

इस्लामपूर पालिकेची सभापती निवड बिनविरोध

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 16 2018 9:22PM

बुकमार्क करा
इस्लामपूर :  वार्ताहर

इस्लामपूर नगरपालिकेतील विषय समित्या व सभापती निवड मंगळवारी बिनविरोध झाली.  बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादीचे विश्वनाथ डांगे यांची वर्णी लागली. विकास आघाडीच्या वाट्याच्या आलेल्या एका सभापतीपदावरही शिवसेनेचे आनंदराव पवार यांची निवड झाली.

स्थायी समितीत राष्ट्रवादीचे संजय कोरे, आनंदराव मलगुंडे यांच्यासह  विकास आघाडीचे विक्रम पाटील हे कायम राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत निवडी  पार पडल्या.  या निवडीवेळी नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित नव्हते.

सभापती व समितीतील सदस्य असे - बांधकाम समिती - सभापती विश्‍वनाथ डांगे. सदस्य - मनीषा पाटील,  जयश्री पाटील,  वैभव पवार, प्रदीप लोहार, बाबासाहेब सूर्यवंशी, जरिना पुणेकर. शिक्षण व क्रीडा-सभापती - आनंदराव पवार,  सदस्य-शहाजी पाटील, सतीश महाडिक, सुप्रिया पाटील, वैशाली सदावर्ते, जयश्री पाटील. आरोग्य व स्वच्छता- सभापती - बशीर मुल्‍ला, सदस्य- डॉ. संग्राम पाटील, सविता आवटे, सुनीता सपकाळ, अमित ओसवाल, सुप्रिया पाटील, शकील सय्यद.

पाणीपुरवठा - सभापती- जयश्री माळी, सदस्य - आनंदराव मलगुंडे, शहाजीबापू पाटील, अ‍ॅड. राजेंद्र डांगे, विक्रम पाटील, वैभव पवार, प्रतिभा शिंदे.

नियोजन व विकास- उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील. सदस्य- डॉ. संग्राम पाटील, खंडेराव जाधव, संजय कोरे, मंगल शिंगण, कोमल बनसोडे, शकील सय्यद. महिला व बालकल्याण- सभापती- संगीता कांबळे, उपसभापती- सीमा पवार, सदस्य- सविता आवटे, सुनीता सपकाळ, अन्नपूर्णा फल्ले, सुप्रिया पाटील.

स्थायी समिती- सभापती- नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, सदस्य- संजय कोरे, आनंदराव मलगुंडे, विक्रम पाटील व विषय समित्यांचे सभापती.