Sun, Jul 21, 2019 00:03होमपेज › Sangli › इस्लामपूर : नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांतील वाद चव्हाट्यावर

इस्लामपूर : नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांतील वाद चव्हाट्यावर

Published On: Jun 13 2018 2:20PM | Last Updated: Jun 13 2018 2:20PMइस्लामपूर : प्रतिनिधी

नगरपालिका सभेत सत्ताधारी गटातील अंतर्गत संघर्ष आज चव्हाट्यावर आला. नगराध्यक्ष निशिकांत पाटील व विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. परवानगीशिवाय बोलण्यास उभे राहिलेल्या विक्रम पाटील यांना नगराध्यक्षांनी खाली बसण्यास सांगितल्याने वादाची ठिणगी पडली.

इस्लामपूर नगरपालिका सभेत  शब्दाने शब्द वाढत गेल्याने नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी विक्रम पाटील यांना सभागृहातून निलंबीत करण्याचा इशारा दिला. त्यांनतरही वाद थांबला नाही. शेवटी पोलीसांना बोलावून विक्रम पाटील यांना बाहेर काढा असा पवित्रा घेतल्याने सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. शेवटी दोन्ही बाजूकडील काही नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद थांबविला.