Sat, Jan 19, 2019 15:44होमपेज › Sangli › इस्लामपुरात व्यावसायिकाचा अनेकांना ५० लाखांचा गंडा

इस्लामपुरात व्यावसायिकाचा अनेकांना ५० लाखांचा गंडा

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:23AMइस्लामपूर : वार्ताहर

येथील मार्केट यार्ड परिसरातील एका व्यावसायिकाने अनेकांना सुमारे 40 ते 50 लाख रुपयांचा गंडा घालून आठ दिवसांपूर्वी पलायन केले आहे. याप्रकरणी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. सावकारांच्या तगाद्याने त्याने पलायन केल्याची चर्चा आहे. 

मार्केट यार्ड परिसरात एकाने व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी त्याने बँका, पतसंस्था तसेच सावकारांकडूनही कर्ज घेतले होते. सावकारांच्या व्याजामुळे त्याचा हा व्यवसाय तोट्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याची देणी वाढत गेली. 

या  व्यवसायाला अनेक शेतकर्‍यांनी मालाचा पुरवठा केला होता. त्या शेतकर्‍यांचे पैसेही त्याने दिलेले नाहीत. असे 20 ते 25 शेतकरी, व्यापारी यांचे तसेच  सावकारांचे सुमारे 40 ते 50 लाख रुपये  तो व्यावसायिक देणे आहे. पैशांचा तगादा लागल्याने त्याने  दि. 5 एप्रीलपासून  व्यवसायाच्या ठिकाणाला टाळे ठोकून पलायन केले आहे. याआधी त्याने  त्या ठिकाणचे सर्व फर्निचरही उचलून नेले आहे. त्याने पोबारा केल्याने त्यांच्याकडून पैसे येणे असणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. 

याप्रकरणी शनिवारी त्याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात काहीजणांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली  आहे. 

Tags : sangli, Islampur businessman, Many fraud,  50 lakhs,  sangli news