Fri, Apr 26, 2019 10:06होमपेज › Sangli › इस्लामपूर नगरपालिकेचा ‘कंपोस्ट खत’ प्रकल्प सुरू

इस्लामपूर नगरपालिकेचा ‘कंपोस्ट खत’ प्रकल्प सुरू

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 9:14PM

बुकमार्क करा
इस्लामपूर : शहर वार्ताहर

इस्लामपुरात पालिकेच्यावतीने कंपोस्ट खताचा प्रकल्प पूर्ण  क्षमतेने सुरू झाला आहे. दररोज पालिकेकडून शहरातील 3 टन कचरा गोळा केला जातो. ओला-सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत निर्मिती केली जात आहे. दररोज 1 टन कंपोस्ट खत तयार होत आहे. या प्रकल्पामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. 

इस्लामपूर-खेड रस्त्यालगत असणार्‍या 12 एकर जमिनीवर कंपोस्ट खताचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या ठिकाणी शहरातील कचर्‍याचे  एकत्रिकरण केले जात आहे. ओला कचरा व सुका कचरा बाजूला केला जातो.  

प्लॅस्टिक विरहित कचर्‍यावरती जैविक कल्चरची प्रक्रिया केली जाते. यासाठी मोठ्या आयताकृती टाक्यांची उभारणी केली आहे. 40 ते 50 दिवसानंतर टाक्यातील तयार झालेले कंपोस्ट खत बाहेर काढून ते मशीनवर चाळण्याची प्रक्रिया केली जाते. दररोज 1 टनाच्या आसपास कंपोस्ट खत तयार होत आहे.

हे खत कोल्हापूर येथील प्रयोगशाळेतून तपासले आहे. 25 किलोच्या गोणींमध्ये नत्र 1.76 टक्के, स्फुरद 0.86, पालाश 0.51 एवढी मुख्य अन्नद्रव्यांची मात्रा  आहे.