Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Sangli › वाळवा तालुका भाजप कार्यकारिणी जाहीर

वाळवा तालुका भाजप कार्यकारिणी जाहीर

Published On: Jan 21 2018 2:54AM | Last Updated: Jan 20 2018 8:23PMइस्लामपूर : वार्ताहर

वाळवा तालुका भाजपा कार्यकारिणीची निवड तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांनी गुरूवारी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सरचिटणीस मकरंद देशपांडे यांच्याहस्ते निवड पत्र देण्यात आले.  तालुका कोअर कमिटीत स्वरुपराव पाटील, वैभव शिंदे, रणधीर नाईक, दिलीप पाटील, एल. एन. शहा, भास्कर पाटोळे, नंदकुमार कुंभार, संतोष घनवट, महादेव नलवडे, विकास पाटील, अर्जुन बाबर, गजानन फल्ले, विजय कुंभार आदींसह 20 जणांची निवड झाली. तालुका युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी शिगाव येथील युवक नेते संंग्रामसिंह स्वरूपराव पाटील तर महिला तालुका उपाध्यक्षपदी अर्चना प्रदीप पोळ यांची निवड झाली.

विविध आघाडीचे अध्यक्ष पुढीलप्रमाणे : कायदा : अ‍ॅड. मिनाज मिर्झा, उद्योग - प्रकाश पोरवाल, व्यापार - सुहास पाटील, सहकार  - बाळासाहेब कोकाटे, माजी सैनिक - जयसिंग नांगरे, सांस्कृतिक - वैभव वाघमोडे, शिक्षक -वर्षा काकडे, कामगार - निवास गायकवाड, ओबीसी भानुदास पाटोळे, अल्पसंख्यांक - सलमान आवटी, ज्येष्ठ कार्यकर्ता  - बजरंग माने, इस्लामपूर शहर युवा मोर्चा अध्यक्ष - चंद्रशेखर तांदळे, आष्टा शहर अध्यक्ष- दीपक थोटे तर अमित कदम यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली.  माजी आ. भगवानराव साळुंखे, पक्षप्रतोद विक्रम पाटील, वैभव शिंदे, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, विजय कुंभार, धैर्यशील मोरे, प्रमोद बनसोडे, आशा पवार उपस्थित होते.