Thu, Sep 20, 2018 04:09होमपेज › Sangli › पोलिस भरतीत गुण वाढविणारे रॅकेट उघड

पोलिस भरतीत गुण वाढविणारे रॅकेट उघड

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 12:27AMनांदेड : प्रतिनिधी

2018 फेबु्रवारी-मार्च महिन्यात झालेल्या पोलिस भरतीमध्ये काही न लिहिता रिकाम्या उत्तरपत्रिका पाठवून गुण वाढवून देणार्‍या सांगली येथील सॉफ्टवेअर कंपनीच्या कर्मचार्‍यांसह वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी  दिली. 

नांदेड पोलिस भरती फेबु्रवारी-मार्च महिन्यात झाली. यामध्ये 1 हजार 198 उमेदवारांनी ही लेखी परीक्षा दिली. मात्र काही उमेदवारांनी उत्तरपत्रिका न लिहिता त्या कोर्‍या सोडल्या. या उत्तरपत्रिका तपासणीचे काम एसएसजी सांगली येथील कंपनीकडे दण्यात आले होते. या प्रकरणात पोलिस दलातील आयआरबी औरंगाबाद येथील नामदेव ढाकणे याने या कंपनीसोबत गुण वाढवून देण्यासाठी सलगी साधली. नांदेड येथे भरतीसाठी आलेल्या बारा विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्याची हमी घेतली. त्यानुसार या बारा विद्यार्थ्यांना नव्वदपेक्षा अधिक गुण हे लेखी परीक्षेत मिळवून दिले. पडताळणी दरम्यान जालना जिल्ह्यातील सहा विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण मिळाल्याने ही बाब उघड झाली. 

Tags : sangli,  police recruitment, Increasing mark, Racket exposed, sangli news,