Fri, Sep 21, 2018 05:39होमपेज › Sangli › कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 8:11PMसांगली : प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सांगलीत कृष्णेच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. नदीपात्रात वाढ होत असल्याने पाणी वाहू लागले आहे. चांदोलीचे धरण 66 टक्क्यावर भरल्यामुळे अन्य गावातील नदीपात्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यात गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील वाळवा व शिराळा तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. सांगलीत कृष्णा नदीला पाणी येत आहे. शिराळा व वाळवा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. चांदोली धरण 66 टक्के भरले आहे.