Wed, Jan 23, 2019 02:53होमपेज › Sangli › विद्यार्थ्यांना शेतातील काम करण्याचे शिक्षण गरजेचे

विद्यार्थ्यांना शेतातील काम करण्याचे शिक्षण गरजेचे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिराळा : प्रतिनिधी 

युवकांत देशप्रेम रुजवायचे असल्यास प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शेतातील मातीत काम करण्याचे सक्तीचे शिक्षण असले पाहिजे, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केलेे.

येथील राजे शिवाजी प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित कृषी, औद्योगिक, पशु-पक्षी, व्यावसायिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कुलकर्णी बोलत होत्या. माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, युवा नेते सत्यजित नाईक, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेश यादव प्रमुख उपस्थित होते. प्रदर्शनाचे सिनेअभिनेत्री कुलकर्णी यांच्याहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.   

कुलकर्णी म्हणाल्या, हे प्रदर्शन म्हणजे इथल्या मातीला अभिमान वाटावा असा आदर्श उपक्रम आहे. माजी आमदार नाईक म्हणाले, शेतकरी वर्गास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व शेतीपूरक व्यवसाय करणे गरजेचे आहे. देशमुख म्हणाले,  कृषी क्षेत्रात नवीन पिढीने उतरून नवतंत्राने शेती केली पाहिजे. सुखदेव पाटील, विक्रम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, महादेव कदम, सुखदेव पाटील, विजयराव नलवडे, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, विजयराव यादव, देवेंद्र पाटील, गौतम पोटे, संजय हिरवडेकर, मुख्याधिकारी अशोक कुंभार उपस्थित होते. 

 

Tags : Shirala, Shirala news, agricultural exhibition, Inauguration,


  •