Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Sangli › भाजपच्या नादी लागू नका : डॉ. कदम

भाजपच्या नादी लागू नका : डॉ. कदम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जत : प्रतिनिधी

देशात सर्वत्र काँग्रेसला चांगले वातावरण आहे. त्यामुळे भाजपच्या नादाला लागू नका. सर्वांनी मतभेद विसरून कामाला लागा. जतच्या जनतेचे काँग्रेसवर प्रेम आहे. त्यामुळे नगरपालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार आहे असे प्रतिपादन माजीमंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केले. पालिका निवडणूक काँग्रेसच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कदम बोलत आले. 

येथील जुन्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जागेत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी आमदार उमाजीराव सनमडीकर, जि.प. सदस्य विक्रम सावंत, तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, नाना शिंदे, रविंद्र सावंत, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी बन्नेनवर, नगराध्यक्ष इकबाल गवंडी, उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, महादेव कोळी, अशोक बन्नेनवर, उपाध्यक्ष कुंडलिक दुधाळ उपस्थित होते. 

डॉ. कदम म्हणाले, भाजप खोटी आश्‍वासने देऊन सत्तेत आले आहे. आता त्यांच्या विरोधात हवा आहे. गुजरातमध्ये त्यांची वाईट अवस्था झाली आहे. एकट्या राहुल गांधी यांच्या विरोधात त्यांचे 14 राज्यांचे आमदार लढत आहेत. जतमधील भाजपची तशीच अवस्था आहे. नगर पालिकेत काँग्रेसला चांगले वातावरण आहे. ज्यांना काँग्रसेसची उमेदवारी मिळाली नाही त्यांनी भाजपच्या नादी लागू नये सर्वांनी एकजुटीने कामाला लागा. सत्ता आपलीच आहे.

विक्रम सावंत म्हणाले, विलासराव जगताप हे निष्क्रिय आमदार आहेत. त्यांची सर्वत्र सत्ता असताना त्यांना नगरपालिकेसाठी उमेदवार मिळाले नाहीत. उसने उमेदवार उभे केले आहेत. यातच त्यांचा पराभव झाला आहे. कर्जमाफी, गॅस, पेट्रोल, डिझेल दरातील वाढ, महागाईने जनता त्रस्त झाली आहे.