Fri, Jul 19, 2019 21:58होमपेज › Sangli › स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इस्लामपूर राज्यात बारावे 

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इस्लामपूर राज्यात बारावे 

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 10:44PMइस्लामपूर : वार्ताहर

स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात इस्लामपूर नगरपालिकेचा देशात 17 वा तर राज्यात 8 वा क्रमांक आला आहे. देशभरातील 1 हजार 600 शहरांमधून पहिले 50 क्रमांक काढण्यात आले. त्यामध्ये 2 हजार 931 गुण इस्लामपूरने मिळवले. पालिकेला दहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.

अभियानाअंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. घरोघरी डस्टबिनचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे आता ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यात येत आहे.

स्वच्छता अ‍ॅपवर नागरिकांच्या स्वच्छतेबाबत प्रतिक्रियाही जाणून घेण्यात येत होत्या. या सर्वेक्षणाचा शनिवारी निकाल जाहीर झाला.4 हजार गुणापैकी 3 हजार 184 गुण मिळवून पाचगणी नगरपालिका देशात पहिली तर तेलंगणा राज्यातील सिध्दीपेठ पालिका 3 हजार 60 गुण मिळवून दुसरी आली आहे. महाराष्ट्रातीलच शिर्डी पालिका देशात तिसरी आली आहे.

मिळालेल्या 2 हजार 931 गुणांची विभागणी अशी ः शहरवासियांच्या स्वच्छता अ‍ॅपवरील प्रतिक्रिया - 1 हजार 248, थेट निरीक्षण- 997, सुविधा- 686 गुण. या सर्वेक्षणासाठी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.