Sat, Jul 20, 2019 15:30होमपेज › Sangli › पालकमंत्र्यांकडूनच सोलापुरात पालिकेच्या जागेवर डल्ला

पालकमंत्र्यांकडूनच सोलापुरात पालिकेच्या जागेवर डल्ला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सरकारमधील आठ-दहा मंत्र्यांनी कशाप्रकारे डल्ला मारला हे जनतेला माहीत आहे. सोलापूर महापालिकेच्या जागेवर डल्ला मारून बंगला बांधलेल्या सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना राष्ट्रवादीवर टीका करण्याचा अधिकार नाही, असा पलटवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान राष्ट्रवादीच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाची झळ बसू लागल्याने सरकार अस्वस्थ झाल्याचा आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केला. 

‘डल्ला मारणार्‍यांकडूनच हल्लाबोल’, अशी टीका पालकमंत्री  देशमुख यांनी रविवारी सांगलीत केली होती.  बजाज म्हणाले, राज्यातील भाजप सरकारमधील आठ-दहा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. पारदर्शी कारभाराची भाषा करणार्‍या सरकारचा कारभार जनता जाणून आहे.  पालकमंत्री देशमुख यांनी राष्ट्रवादीवर केलेली टीका अतिशय चुकीची आहे. दिलीपराव पाटील म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह राज्यात सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन प्रचंड यशस्वी झाले आहे. लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फडणवीस सरकार विरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. सरकारने शेतकरी, कष्टकरी, व्यापार्‍यांसह सर्वच घटकांची निराशा केली आहे.
सरसकट कर्जमाफी न केल्याने शेतकर्‍यांत असंतोष आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नाही. निकष जाचक आहेत. लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. नोटाबंदीमुळे ग्रामीण

अर्थव्यवस्था जवळपास उद्ध्वस्त झाली आहे. अजूनही ती या धक्यातून सावरलेली नाही. नोटांबदी, जीएसटी, वाढती बेरोजगारी, महागाई यामुळे समाजातील सर्व घटक त्रस्त झाले आहेत. 
कमलाकर पाटील, राहुल पवार, सागर घोडके व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags : Sangli, Sangli News,  sangli municipal corporation, land fraud, guardian minister 


  •