Mon, Apr 22, 2019 21:39होमपेज › Sangli › विधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न

विधीमंडळ अधिवेशनात आज तारांकित प्रश्‍न

Published On: Dec 12 2017 2:09AM | Last Updated: Dec 11 2017 11:47PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे खूनप्रकरणी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात  तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे. मंगळवारी होणार्‍या चर्चेत आठव्या क्रमांकावर हा प्रश्‍न आहे. त्यामुळे त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली. अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी मिळावी यासाठीही या अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह त्याच्या साथीदारांनी अनिकेतचा पोलिस कोठडीत खून करून मृतदेह जाळला होता. ही घटना घडल्यानंतर आमदार गाडगीळ यांनी त्याची तात्काळ दखल घेत शहर पोलिस ठाण्याकडे धाव घेतली होती. राज्यभर हे प्रकरण गाजत असताना  याप्रकरणी कोथळे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते.  त्यांनी विधीमंडळाच्या  हिवाळी   अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली असून त्यावर उद्या तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आला आहे.