Wed, Sep 26, 2018 14:10



होमपेज › Sangli › विटा : मोबाईल कंपनीकडून बेकायदेशीर रस्ता खोदाई  (व्हिडिओ)

विटा : मोबाईल कंपनीकडून बेकायदेशीर रस्ता खोदाई  (व्हिडिओ)

Published On: Dec 12 2017 4:18PM | Last Updated: Dec 12 2017 4:21PM

बुकमार्क करा





विटा : विजय लाळे 

विटा नगर पालिकेच्या हद्दीतील शिवाजी नगर,  नेवरी रस्त्यालगत रिलायन्स कंपनीने ओ.एफ.सी केबल टाकण्यासाठी खोदकाम चालू केले आहे ते बेकायदेशीर आहे. हे खोदकाम पूर्णपणे थांबवावे आणि जो ठेकेदार आहेत त्याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा अशी मागणी आम्ही पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्याकडे केल्याची माहिती विरोधी नगरसेवक आणि शिवसेनेचे युवा नेते अमोल बाबर यांनी केली आहे. याबाबत बाबर यांनी संबंधित काम बेकायदेशीर असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनीही मान्य केल्याचे सांगितले. 

दरम्यान रिलायन्स कंपनीने आपल्याकडे ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी परवानगी मागितली आहे, त्यांनी ज्या रस्त्यावर मागणी केली आहे त्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून लांबी रुंदी वगैरे पाहून त्यांना आम्ही डिमांड नोटीस दिली. त्यांनी पैसे भरलेले आहेत. आता त्यांना पालिकेची सभा झाल्यानंतर मंजुरी देण्यात येईल. मात्र कंपनीने त्या अगोदरच नेवरी रस्त्याचे काम सुरु केले होते ते आम्ही थांबवले आहे. उद्या परवा सभा झाल्यानंतर परवानगी देणार आहोत असे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले आहे.