Thu, Apr 25, 2019 23:52होमपेज › Sangli › हिंदू-मुस्लिम चौकातील समस्यांकडे दुर्लक्ष

हिंदू-मुस्लिम चौकातील समस्यांकडे दुर्लक्ष

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 8:21PMसांगलीतील हिंदू-मुस्लिम चौकामधील समस्यांची आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी  दोन-तीन महिन्यांपूर्वी पाहणी केली होती. त्यांनी तातडीने येथील धोकादायक व निकृष्ट गटार दुरुस्त करून घेण्यास सांगितले होते. यानंतर नागरिकांनीही मनपाकडे  पाठपुरावा केला. मात्र आजअखेर प्रशासन व स्थानिक नगरसेवकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. याठिकाणी मोठा अपघात होवून जीवितहानी  होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नागरिकांत संतापाच्या भावना आहेत. तसेच या परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. मोकाट जनावरेही वाढलेली आहेत. या रस्त्यावरून शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. 

- मुबारक मुल्ला, सांगली