होमपेज › Sangli › ...तर मी निवडणूक लढवायचे बंद करेन : राजू शेट्टी 

...तर मी निवडणूक लढवायचे बंद करेन : राजू शेट्टी 

Published On: Feb 26 2018 4:19PM | Last Updated: Feb 26 2018 4:49PMइस्लामपूर: वार्ताहर

माझ्या मतदार संघात कोणाचे संरक्षण घेऊन फिरायची मला गरजच काय? ज्या दिवशी अशी वेळ येईल त्या दिवशी मी निवडणूक लढवायचे बंद करेन असे प्रतिपादन खा. राजू शेट्टी यांनी इस्लामपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.

रयत क्रांती संघटनेने खा. राजू शेट्टी यांना वाळवा तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला होता. त्या पार्श्र्वभूमीवर खा. शेट्टी यांनी सोमवारी इस्लामपूरला भेट दिली. त्यांनी कार्यालयाच्या झालेल्या तोडफोडीची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

ते म्हणाले, मी कालच एकटा इस्लामपुरात येऊन गेलो. मला मतदारसंघात फिरायची कोणाची भिती नाही. माझ्या कार्यालयाची दुरुस्ती कार्यकर्ते करतील. आम्ही काय भिकारी व खंडणी बहाद्दर नाही. माझ्या मतदार संघात कोणाचे संरक्षण घेऊन फिरायची मला गरजच काय? ज्या दिवशी अशी वेळ येइल, त्या दिवशी मी निवडणूक लढवायचे बंद करेन.

संबंधित बातम्याः 

‘स्वाभिमान’ गहाण; ‘रयत’ देशोधडीला
खडंणीबहाद्दर, बलात्काऱ्यांचे कारनामे उघड करू : खासदार राजू शेट्टी

शेतकर्‍यांना गोळ्या घालणार्‍यांच्या गळ्यात गळे कसे काय? : ना खोत  

सदाभाऊ खोतांवरील हल्‍ल्याचे इस्‍लामपुरात पडसाद (Video)