Thu, Aug 22, 2019 12:28होमपेज › Sangli › मला २०१९ची काळजी नाही : आमदार बाबर

मला २०१९ची काळजी नाही : आमदार बाबर

Published On: Jan 01 2018 6:45PM | Last Updated: Jan 01 2018 6:45PM

बुकमार्क करा
विटा : विजय लाळे 
माझ्यावर उगाच व्हाट्स अप आणि फेसबुकवर टीका करणाऱ्यांना टेंभू योजनेची माझ्या इतकी खडा न खडा माहिती आहे  का? असा प्रश्न आमदार अनिलराव बाबर यांनी विरोधकांना विचारला आहे. करंजे (ता. खानापूर) येथील नवनिर्वाचित उपसरपंच यांच्या आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुशांत देवकर, पंचायत समिती सभापती मनिषा बागल, उपसभापती बाळासाहेब नलवडे, करंजेच्या सरपंच रास्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. मला २०१७ ची काळजी नव्हती, २०१८ची नाही आणि २०१९ची तर अजिबात नाही, असे आमदार बाबर यांनी स्पष्ट केले.  

ते म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आमदारकीपेक्षा मोठा आहे. त्यामुळे टेंभू योजनेची पूर्तता करणे, हीच माझी खरी आमदारकी आहे. टेंभू योजना पूर्ण करणे हे माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्याच्यादृष्टीने मी भूमिका घेऊन काम करत आहे. केवळ व्यक्तिद्वेषापोटी माझे सर्व विरोधक माझ्याविरोधात एकवटले आहेत. मी दहा वर्षे आमदार नव्हतो तर कुणाला अडचणीत आणत नव्हतो. लोकशाही मानली ज्यांना काम करायची संधी मिळाली होती. त्यांना मोकळीक दिली. पण काम करू शकला नाही. आता तीन वर्षांने तुमच्या लक्षात आले आहे. तुम्ही काम करू शकला नाही, हे तुमचे दुर्देव. टेंभूसाठी कुणी काय केलं आणि कोण काय करतंय  हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.' 

आमदार बाबर म्हणाले, 'लोकशाहीत ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत निवडणुका हा राजकीय प्रक्रियेचा भाग आहे. पण, हr प्रक्रिया विकासाला त्रास देणार नाही, अशी आपली भूमिका असली पाहिजे. आता ग्रामपंचायत निवडणूक संपली आता विकासाच्या दृष्टीने काम केले पाहिजे. काहींना वाटेल आता मी आमदार आहे मला कोणी अडचण आणू नये म्हणून मी म्हणतोय. मधल्या १० वर्षांच्या काळात मी आमदार नव्हतो पण मी कुणाला अडचण आणली नाही. मी काय व्हाट्स अप अन फेसबुकवर टाकत नव्हतो. ज्यांना काम करायची संधी लोकांनी दिली त्यांना आम्ही मोकळीक दिली आम्ही लोकशाही मानली. तेंव्हा तुम्ही टेंभूचे काम करू शकला नसला तर आता तीन वर्षांनंतर लक्षात आलं का? की कुणीतरी टेंभूचे काम केलं म्हणून एकाला शिव्या द्यायच्या अन दुसऱ्याला ह्यांनी नाय ह्यांनी केलं लोकांना सगळं माहित असतं कोणी केलं काय केलं. मला त्याच्या खोलात जायचं नाय. पण, माझ्या परस्पर तुम्ही जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा किंवा माझ्याबरोबर चला टेंभूचे १ ए , १ बी पंप हाऊस आहे तिथून तुम्हाला खडा न खडा माहिती नाही दिली तर विचारा.' योजनेत काय काय बदल केले पाहिजेत आणि काय सुविधा वाढवल्या तर लोकांना चांगला फायदा होणार आहे ही भूमिका घेऊन प्रयत्न केल्याचे आमदार बाबर यांनी स्पष्ट केले. 

केवळ व्यक्ती द्वेषातून एकत्र आलेल्या विरोधकांनी टेंभूच्या विषयात पोश्टर बाजी सुरु केल्याचा आरोप बाबर यांनी केला.  स्वागत व प्रास्ताविक पोपट माने यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या नीलम सकटे, पंचायत समिती सदस्या कविता देवकर, सारिका माने, माजी सरपंच दिलीप माने, माजी उपसभापती दादासाहेब पाटील, लक्ष्मण नलवडे, बेनापूरचे माजी सरपंच कृष्णदेव शिंदे, संभाजी जाधव, बेनापूर सोसायटीचे अध्यक्ष गणपतराव भोसले, माजी अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सदाशिव हसबे, प्रकाश खंदारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्रभाकर कुलकर्णी यांनी मानले.