Sat, Jul 20, 2019 12:55होमपेज › Sangli › पत्नीच्या आत्महत्येनंतर सातव्याच दिवशी पतीची आत्महत्या

पत्नीच्या आत्महत्येनंतर सातव्याच दिवशी पतीची आत्महत्या

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 11:16PMदेवराष्ट्रे : वार्ताहर

आसद (ता. कडेगाव) येथील संजय निवास तांदळे (वय 46) यांनी  घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांची पत्नी वनिता यांनी सात दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेमुळे त्यांची तीन मुले पोरकी झाली आहेत. त्याबद्दल सोनहिरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चंद्रकांत किसन तांदळे यांनी या घटनेबाबत चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यातत फिर्याद दिली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी :  दि. 2 फेब्रुवारीरोजी वनिता संजय तांदळे (वय 4 0) यांनी  घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.तेव्हापासून त्यांचे पती संजय तांदळे  सैरभैर  झाले  होते. पत्नीच्या रक्षाविसर्जनानंतर त्यांच्या दोन मुली, एक मुलगा तसेच अन्य कुटुंबीय  इस्लामपूर येथे रहात होते. संजय व त्यांची आई असे दोघेच आसद येथे घरी रहात होते.

सकाळी संजय गावातील अनेकांशी बोलले. नंतर साधारण 8 च्या सुमारास घरी गेले व गळफास लाऊन आत्महत्या केली. काही लोक भेट घेण्यासाठी घरी गेले असता आत्महत्येचा प्रकार लक्षात आला. पोलिस हेडकॉन्स्टेबल किरण हारूगडे  तपास करीत आहेत.