Sun, Jan 20, 2019 11:29होमपेज › Sangli › शेकडो गावातील प्रमुख रस्ते अंधारात

शेकडो गावातील प्रमुख रस्ते अंधारात

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 11 2018 12:35AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील वाळवा-शिराळा, तासगाव तसेच जत तालुक्यात सुमारे दीडशेहून अधिक ग्रामपंचायतींची कोट्यवधीची वीज बिले थकीत असल्याने  पथदिव्यांची कनेक्शन महावितरणने तोडली. त्यामुळे त्या त्या तालुक्यातील गावातील प्रमुख रस्ते अंधारात आहे. 

इस्लामपूर : वाळवा व शिराळा तालुका इस्लामपूर महावितरणच्या अंतर्गत येतो. सुमारे दीडशेहून अधिक गावे असून गेली तीन-चार वर्षांपासून ग्रामपंचायतीची वीज बिले भरलेली नाहीत. सुमारे 8 ते 9 कोटी रुपये थकीत असून शासन स्तरावरून अचानक वीज वितरणला पथदिव्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शनिवारी इस्लामपूर वितरणने दोन्ही तालुक्यातील वीज बंद केली आहे. शासन स्तरावर जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत दोन्ही तालुक्यातील प्रमुख रस्ते अंधारात राहणार आहेत. 

तासगाव तालुक्यातील १५ गावे अंधारात

तासगाव :    वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतींनी थकबाकी न भरल्यामुळे महावितरणने तालुक्यातील 15 गावातील पथदिव्यांची वीज तोडली आहे. ही गावे दोन दिवसापासून अंधारात आहेत. 

यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक झाली होती. यानंतर कनिष्ठ कार्यालयांना वीज तोडण्याचे आदेश देण्यात आले. तालुक्यातील तासगाव एक, तासगाव दोन व सावळज उपविभागाच्या अंतर्गत येणार्‍या सुमारे 15 गावातील पथदिव्यांची वीज महावितरणने दोन दिवसांत तोडली आहे.