Wed, Jan 23, 2019 10:41होमपेज › Sangli › हुमणीमुळे शेकडो एकर क्षेत्र बाधित

हुमणीमुळे शेकडो एकर क्षेत्र बाधित

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 10:46PMकडेगाव : वार्ताहर  

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून  उसावर  हुमणीने आक्रमण केले आहे. त्यामुळे  शेतकरी हादरून गेले आहेत. या किडीचा  हळद, सोयाबीन, भुईमूग आणि भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसतो आहे.

हुमणीच्या हल्ल्याने  उत्पादन घटणार आहे. या भितीने शेतकरी  काळजीत आहेत. शेतकरी हुमणी किडीचा बंदोबस्त  करण्यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर  करीत आहेत. मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. सध्या पावसाने पाठ फिरविली आहे. त्यामुळे  हुमणीची मोठी वाढ झाली आहे. ही कीड तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी संकट ठरते आहे.  तालुक्यात ताकारी व टेंभू योजनेचे पाणी आले आहे. ऊस क्षेत्रात हजारो एकरांची वाढ झाली आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे परिसरातील कारखान्यांना भरपूर ऊस मिळणार आहे. परंतु हुमणी किडीमुळे कारखानदार व शेतकर्‍यांना मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.ही कीड  उसाच्या मुळ्या कुरतडते. त्यामुळे तो  पूर्णपणे वाळून जातो. तालुक्यातील अमरापूर, कडेपूर, कडेगाव,  शिवणी, चिखली, येवलेवाडी, हणमंतवडिये, खेराडे, कोतीज, वडियेरायबाग यासह अन्य गावांत शेकडो एकर ऊस क्षेत्र हुमणी किडीमुळे बाधित झाले आहे.