विटा पालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान 

Published On: Jul 23 2019 8:47PM | Last Updated: Jul 23 2019 8:47PM
Responsive image


विटा : वार्ताहर

स्वच्छ सर्वेक्षणातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते विटा पालिकेचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान ब्रँड अ‍ॅम्बॅसीटर वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी उपनगराध्यक्षा मालती कांबळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, नगरसेवक संजय तारळेकर यांनी स्वीकारला.

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण - २०१८ स्पर्धेत पश्‍चिम विभागातील नॉन अमृत प्रवर्गात विटा शहराने १४ वा गुणानुक्रम तर स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ स्पर्धेत नॉन - अमृत प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर गुणानुक्रम ४ पटकाविला आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील या उल्लेखनीय कामाबद्यल आज  २३ जुलै २०१९ रोजी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील जमशेद भाभा थिएटर नॅशनल सेंटर फॉर परफॉरिमिंग आर्टस येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार,अर्थराज्य मंत्री दिपक केसरकर, नगरविकास संचालक मथ्थू कृष्णन यांच्या उपस्थितीत विटा पालिकेचा सन्मान करण्यात आला.

विटेकरांचे आभार : वैभव पाटील
आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विटा पालिकेचा सन्मान झाला आहे. तो प्रत्येक विटेकर नागरिकाला अभिमान वाटणारा आहे. या कामगिरीत शहरवासियांनी मोठे योगदान दिले आहे. अधिकारी पदाधिकारी, कर्मचारी यांच्यासह सामान्य नागरिकांनी जे सहकार्य दिले त्याबद्यल आम्ही आभारी आहे. भविष्यात असेच मोठया प्रमाणावर स्वच्छता अभियान निरंतर सुरू ठेवून एक आदर्श शहर बनविणार असल्याचे  वैभव पाटील यांनी सांगितले.

 एल्गार परिषदेचा तपास 'एनआयए'कडे सोपवला; राज्य सरकार तपास करत असतानाच निर्णय!


'फोनटॅपिंग प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा'


शित्तूर वारुण परिसरात बिबट्याचा  बछड्यांसह वावर


पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाला? चिमुकलीच्या दोरीवरील कसरतीने उदरनिर्वाह (video)


'सरकारने नागरिकांवर जास्त किंवा मनमानी कर लादणे हा देखील सामाजिक अन्याय'


कोल्हापूर जिल्ह्यासाठी ५८१ कोटींच्या प्रस्तावास मंजूरी


सोलापूर : सांगवीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई


मोदी सरकारला २० वर्षातील सर्वांत मोठा झटका बसणार?


निवड समिती सदस्य पदासाठी अजित आगरकरचाही अर्ज दाखल


कोरोना व्हायरसचे मुंबईत दोन संशयित रुग्ण