Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Sangli › केरळ पूरग्रस्तांना विट्यातून मदत

केरळ पूरग्रस्तांना विट्यातून मदत

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 22 2018 7:12PMविटा : वार्ताहर

केरळमध्ये महापुरामुळे तेथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर या महापुरामध्ये  स्थानिकांबरोबरच खानापूर व आटपाडी तालुक्यातील बहुसंंख्य गलाईबांधव अडकले आहेत. त्यामुळे  विटा पालिका, लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप यांनी पुढाकार घेत मदतीचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत नागरिकांनी  धान्य, कपडे, खाद्यपदार्थ   स्वरूपात मदत केली आहे. माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 5 लाखांचा धनादेश दिला.

केरळ महापूरग्रस्तांसाठी   माजी नगराध्यक्ष पाटील यांच्यासह आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या  सदस्यांनी मदतीचे आवाहन केले होते. विविध संस्था, सामाजिक संघटना, व्यापारी, युवक मंडळे यांनी धान्य, कपडे, खाद्यपदार्थ, औषधे यांची मदत केली आहे. नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी एक महिन्याचे मानधन  तर लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, विटा क्रेडिट सोसायटी, विटा बँक, लोकनेते हणमंतराव पाटील दूध प्रक्रिया संघ, विराज केन्स या संस्थांच्या कर्मचार्‍यांनी एक दिवसाच्या वेतनाची रक्कम वैभव पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. वैभव पाटील यांनी फडणवीस यांच्याकडे 5 लाखांचा  धनादेश दिला. शिवप्रताप पतसंस्था व विश्‍वकर्मा पांचाळ सुतार समाज यांच्यावतीने 500 किलो तांदळाची मदत करण्यात आली. शिवप्रताप ग्रुपचे विठ्ठल साळुंखे, सुतार समाज  अध्यक्ष प्रताप सुतार, उपाध्यक्ष  राजू सुतार, सचिव शरद सुतार, गणेश सुतार उपस्थित होते.  हजारे मळ्यात स्वराज्य महिला मंडळाच्या महिलांनी  पूरग्रस्तांसाठी  धान्य संकलित केले. माजी सभापती अविनाश चोथे, माजी उपनगराध्यक्ष सचिन जाधव, नगरसेवक किरण तारळेकर, संजय सपकाळ, अ‍ॅड.  धर्मेश पाटील, विपुल तारळेकर, विनोद पाटील, विकास जाधव, अमित भोसले, माधव रोकडे उपस्थित होते.