Thu, Apr 25, 2019 16:16होमपेज › Sangli › प्रभाग रचनेबाबत आज सुनावणी

प्रभाग रचनेबाबत आज सुनावणी

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 11:51PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर शुक्रवारी ( दि.13) सुनावणी होणार आहे.  या सुनावणीसाठी राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन यांची नियुक्ती केली आहे. प्रभाग रचनेवर 62 हरकती दाखल झाल्या आहेत. 

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याची मुदत गेल्याच आठवड्यात संपली. या मुदतीत 62 हरकती दाखल झाल्या आहेत. यात आजी-माजी नगरसेवकांसह संभाव्य उमेदवारांनीही तक्रारी दाखल केल्या. प्रभाग क्रमांक 14, 18  मध्ये सर्वाधिक हरकती दाखल आहेत. प्रभागातील एखादा भाग, गल्ली दुसजया प्रभागास जोडावी, प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने झाली आहे., प्रभाग रचना उत्तरेकडून करण्यात आलेली नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. 

नगरसेवक शेखर माने, माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके यांनी प्रभाग रचनेत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. या हरकतीवर शुक्रवारी माधवनगर रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहात सुनावणी होणार आहे.

या सुनावणीला प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महापलिका आयुक्तांच्या उपस्थितीत सुनावणीची प्रक्रिया होईल. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हरकती व सूचनांचे विवरणपत्रासह सुस्पष्ट अभिप्राय आयुक्त यांच्या मार्फत राज्य निवडणुक आयोगाला सादर करावा लागणार आहे. 

हा अभिप्राय 23 एप्रिलपर्यंत सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. सुनावणीचा अभिप्राय अवलोकनी घेऊन त्यावर निवडणुक आयोग 27 एप्रिल रोजी  आयोग निर्णय देईल. त्यानंतर 2 मे रोजी प्रभाग रचना व आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.