Mon, Aug 19, 2019 06:56होमपेज › Sangli › यशासाठी ठाम आत्मविश्‍वास बाळगा; विश्‍वास नांगरे - पाटील

यशासाठी ठाम आत्मविश्‍वास बाळगा; विश्‍वास नांगरे - पाटील

Published On: Jul 06 2018 1:34AM | Last Updated: Jul 05 2018 8:32PMकोकरूड : वार्ताहर

आयुष्यात काही तरी करून दाखवायचे असेल तर नेहमी सकारात्मक आत्मविश्‍वास बाळगला पाहिजे  असे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले.कोकरूड येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या विद्यमाने आयोजित गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख अध्यक्षस्थानी होते. सह्याद्री खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संपतराव देशमुख, माजी सभापती बाळासाहेब पाटील उपस्थित होते. 

सत्यजित देशमुख म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात कष्ट करण्याची ताकत व प्रबळ  इच्छाशक्ती असल्यास यश हमखास मिळते हे आजच्या सत्कार मूर्तींनी दाखवून दिले आहे. यशाचा शिखर गाठायचे असल्यास परिस्थिती कधीही आड येऊ देऊ नका. एस.एस.सी मध्ये मिळालेले मार्क्स हा केवळ आभास असतो.  विद्यार्थ्यांनी  कठोर परिश्रमाची तयारी ठेवली पाहिजे. डॉ. गजानन घोडे व डॉ. निलेश अनुते यांनी पी. एच. डी. मिळवल्याबद्दल,  प्रदीप पाटील (अधीक्षक कस्टम), विद्या पाटील यांची मंत्रालय कक्ष अधिकारी आणि जान्हवी विश्‍वास नांगरे पाटील हिला 10 वी मध्ये 94 टक्के गुण मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.सरपंच विलास वाघमारे, सुहास पाटील, माजी सरपंच शामराव साळवी, विकास नांगरे, श्रीरंग नांगरे, गजानन पाटील, सुजित देशमुख, अंकुश नांगरे, तानाजी पाटील, लक्ष्मन नांगरे, निवास नांगरे, सुनील पाटील उपस्थित होते.