Tue, May 21, 2019 00:39होमपेज › Sangli › दैनिक ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव

दैनिक ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव

Published On: Jul 02 2018 1:48AM | Last Updated: Jul 02 2018 12:44AMइस्लामपूर : प्रतिनिधी

दै. ‘पुढारी’ इस्लामपूर विभागीय कार्यालयाच्या नवीन वास्तूत शुभारंभप्रसंगी आयोजित स्नेहमेळाव्यास परिसरातील सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दै. ‘पुढारी’स शुभेच्छा दिल्या. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. खा. राजू शेट्टी, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, आ. शिवाजीराव नाईक, माजी आ. मानसिंगराव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, नानासाहेब महाडिक, विनायकराव पाटील,  माणिकराव पाटील, माजी आ. भगवानराव साळुंखे, सहकार बोर्डाचे प्रतापराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, सागर खोत यांच्यासह असंख्य मान्यवरांनी या स्नेहमेळाव्यास हजेरी लावली. 

इस्लामपूर येथील वाळवा-शिराळा तालुक्यांसाठीच्या दै. ‘पुढारी’च्या इस्लामपूर विभागीय कार्यालयाचे स्वत:च्या नव्या वास्तूत स्थलांतर झाले.यानिमित्ताने आयोजित   स्नेहमेळाव्यास वाळवा-शिराळा, कराड परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली. व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक, जि.प.चे माजी सदस्य सम्राट महाडिक, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, विकास आघाडीचे पक्षप्रतोद विक्रम पाटील, नगरसेवक वैभव पवार, शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, प्रांताधिकारी नागेश पाटील, पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, महिला काँगे्रसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे, सभापती संगीता कांबळे, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुश्मिता जाधव, नगरसेविका सीमा पवार, प्रतिभा शिंदे, कोमल बनसोडे, जयश्री पाटील, वाळव्याचे माजी सरपंच गौरव नायकवडी, आष्ट्याच्या नगराध्यक्षा स्नेहा माळी, झुंजारराव पाटील, शिवसेनेचे अभिजीत पाटील आदींसह विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.दै. पुढारीचे असिस्टंट जनरल मॅनेजर राजेंद्र मांडवकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार यांच्यासह पुढारी परिवारातील सर्व सदस्यांनी स्वागत केले. 

डॉ. जाधव यांचे मान्यवरांकडून अभिनंदन...

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. योगेश जाधव यांना परिसरातील मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. डॉ. योगेश जाधव यांनीही आलेल्या मान्यवरांची आस्थेने विचारपूस केली.