Thu, Nov 22, 2018 16:08होमपेज › Sangli › अनधिकृत बांधकामांवर हातोडा घाला

अनधिकृत बांधकामांवर हातोडा घाला

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 10:58PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

पार्किंग, सामासिक अंतर गायब करून शहरात अनेक बेकायदा अतिक्रमणांचा सपाटा सुरू आहे. मनपा क्षेत्रात हार्डशिप योजनेची अंमलबजावणी होत नाही. यामुळे आर्थिक उत्पन्‍न बुडित असल्याचा आरोप करीत सदस्यांनी स्थायी समिती सभेत आक्रमक पवित्रा घेतला. याप्रकरणी सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी बेकायदा बांधकामांवर हातोडा घालण्याचा आदेश दिला.

शिवराज बोळाज म्हणाले, शहरात मध्यवर्ती वस्त्यांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. मोठमोठ्या इमारती होत असून, त्याचे पार्किंगच गायब करून वाहने रस्त्यावर येत आहेत. याला महापालिकेचे अधिकारीच सामील आहेत. उद्या यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होईल.दिलीप पाटील म्हणाले, भर बाजारात बालाजी चौकातील एका व्यावसायिक इमारतीचे अतिक्रमण झाले आहे. रस्त्यापासून अंतर सोडले नाही, पार्किंगही अपुरे असून या बांधकामाबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या.  त्या इमारतीच्या बांधकामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप अहवाल सादर केला नाही. यावर सदस्यांनी सभेत जाब विचारला.