Thu, Jul 18, 2019 02:14होमपेज › Sangli › अर्धा जिल्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात 

अर्धा जिल्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात 

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 9:02PMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 285 गावांमध्ये शासनाने मध्यम दुष्काळ  जाहीर केला आहे. त्यामध्ये मिरज  तालुक्यातील 39, कवठेमहांकाळ - 60, तासगाव - 69, जत - 50 तर खानापूर तालुक्यातील 67   गावांचा समावेश आहे. गेल्या खरीप हंगामात 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी असल्याने या गावांना टंचाईतील सवलतींचा लाभ मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी विजयकुमार - काळम पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या निमित्ताने जवळपास अर्धा जिल्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात भरडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.    

मात्र दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या  आटपाडी तालुक्यातील एकाही गावाचा यामध्ये समावेश नाही. गेल्या वर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. शेतकर्‍यांनी मशागती केल्या.काहींनी खरीप पेरणीही केली.  मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिली, त्यामुळे पेरणी वाया गेली. शेवटच्या टप्प्यात मात्र जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला. मात्र शेतीच्या एकूण उत्पादनात घट झाली.  शेतकर्‍यांना त्याचा फटका बसला. 

महसूल, कृषी विभागाने नोव्हेंबरमध्ये  पीक  पाहणी अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यात खरीप हंगामात जिल्ह्यातील 285 गावांत 50 पैसेपेक्षा कमी आणेवारी असल्याचे नोंदवण्यात आले होते. मात्र अन्य बहुतेक भागात सरासरीच्या  70 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मदतीच्या निकषातून ही गावे वगळण्यात आली होती. आता या गावांना मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यांना विविध उपाययोजना लागू केल्या आहेत.  

तालुकानिहाय मध्यम दुष्काळी गावे

मिरज : आरग, बेडग, लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, लक्ष्मीवाडी, संतोषवाडी, जानराववाडी, मालगाव, खंडेराजुरी, गुंडेवाडी, पायाप्पाचीवाडी, एरंडोली, व्यंकोचीवाडी, शिपूर, डोंगरवाडी, बेळंकी, कदमवाडी, सलगरे, चाबुकस्वारवाडी, बुधगाव, बिसूर, कानडवाडी, कावजी खोतवाडी, वाजेगाव, मानमोडी, कवलापूर, रसूलवाडी, कांचनपूर, काकडवाडी, कांचनपूर, सांबरवाडी, काकडवाडी, तानंग, कळंबी, सिध्देवाडी, सोनी, करोली एम, भोसे, पाटगाव, मल्लेवाडी. 

तासगाव : तासगाव, वासुंबे, कवठेएंकद, चिंचणी, भैरववाडी, नागाव, मतकुणकी, बेंद्री, शिरगाव, कुमठे, येळावी, जुळेवाडी, तुरची, राजापूर, ढवळी, वंजारवाडी, निमणी, नागाव(नि), नेहरूनगर, विसापूर, पाडळी, हातनोली, धामणी, हातनूर, गोटेवाडी, शिरगाव, पानमळेवाडी, लिंब, बोरगाव, आळते, निंबळक, चिखलगोठण, मांजर्डे, आरवडे, तासगाव पुणदी, पेड, मोराळे, धोंडेवाडी, बलगवडे, गौरगाव, विजयनगर, नरसेवाडी, किंदरवाडी, कचरेवाडी, सावळज, सिध्देवाडी, डोंगरसोनी, सावळज, अंजनी, नागेवाडी, वडगाव, लोकरेवाडी, जरंडी, दहीवडी, वायफळे बिरणवाडी, यमगरवाडी, बस्तवडे, मणेराजुरी, योगेवाडी, सावर्डे , गव्हाण, वज्रचौंडे , खुजगाव, वाघापूर, कौलगे, लोढे, डोर्ली, उपळावी, धुळगाव.

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ, जाधववाडी, झुरेवाडी, लांडगेवाडी, शिरढोण, जायगव्हाण, अलकूड (एम), नांगोळे, रांजणी, लोणारवाडी, कोकळे, करलहट्टी, बसाप्पाचीवाडी, कुची, जाखापूर, तिसंगी, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, घाटनंद्रे, रायवाडी, नागज, आरेवाडी, केरेवाडी, आगळगाव, शेळकेवाडी, देशिंग, मोरगाव, हरोली, बनेवाडी, खंरसिंग, बोरगाव, अलकूड (एस), मळणगाव, हिंगणगाव, शिंदेवाडी, विठुरायाचीवाडी, थबडेवाडी, अग्रण धुळगाव, पिंपळवाडी, करोली (टी), म्हैसाळ (एम), रामपूरवाडी कोनगोळी, कुटकोळी, सराटी, ढालगाव, कदमवाडी, घोरपडी, शिंदेवाडी, निमज, दुधेभावी, ढोलेवाडी, चोरोची, चुडेखिंडी, जांभूळवाडी, इरळी, मोघमवाडी, लंगरपेठ, ढालेवाडी.

जत : रामपूर, साळमळगेवाडी, खिलारवाडी, शिंदूर, बसर्गी, गुगवाड, वज्रवाड, बनाळी, अंतराळ, वायफळ, शिंगणहळ्ळी, मोकासेवाड, औंढी, लोहगाव, येळावी, खैराव, टाणेवाडी, बिरनाळ, कोसारी, वाळेखिंडी, तिप्पेहळ्ळी, नवाळवाडी, धावडवाडी, हिवरे, प्रतापपूर, गुळवंची, डफळापूर, खलाटी, शिंगणापूर, जिरग्याळ, शेळकेवाडी, एकुंडी, मिरवाड, बाज, बेळुंखी, अंकले, डोर्ली, कंठी, वाशाण, बागेवाडी, तिल्याळ, सालेकिरी, माडग्याळ, सोन्याळ, लकडेवाडी, जाडरबोबलाद, सनमडी, कोळेगिरी, भिवर्गी, करेवाडी. 

खानापूर : विटा , माहुली, नागेवाडी, चिखलहोळ, वलखड, हिंगणगोदे, गार्डी, धानवड, पारे, कुर्ली, घाडगेवाडी, बामणी, मंगरूळ, चिंचणी (मं), कार्वे, भाळवणी, पंचलिंगनगर, आळसंद, वाझर, कमळापूर, बलवडी, तांदळगाव, जाधवनगर, ढवळेश्‍वर, कळंबी, खंबाळे, लेंगरे, भूड, माधळमुठी, देवखिंडी, वाळूज, वेजेगाव, साळशिंगी, देवगनर, भेंडवडे, भाग्यनगर, सांगोले, जोंधळखिंडी, भिकवडी, खानापूर, रामनगर, ऐनवाडी, जखीणवाडी, पोसेवाडी, जाधववाडी, गौरवाडी, घोटी खुर्द, घोटी बुद्रुक, रेवणगाव, धोंडगेवाडी, रेणावी, वासुंबे, भांबर्डे, करंजे, मोही, पळशी, बेनापूर ताडाचीवाडी, हिवरे, कुसबावडे, भडकेवाडी, शेंडगेवाडी, बलवडी (खा), मेंगाणवाडी, बाणूरगड, सुलतानगादे.