Sat, Apr 20, 2019 18:16होमपेज › Sangli › ३५७ कोटींची वसुली नोटीस

३५७ कोटींची वसुली नोटीस

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 10:54PMमिरज : शहर प्रतिनिधी

तालुक्यातील आरग येथील गुटखा कारखान्यावरील कारवाईप्रकरणी फिरोज, फारूक आणि मुसा जमादार या पिता-पुत्रांना सोमवारी केंद्रीय जीएसटीचे अप्पर महासंचालक यांच्या आदेशाने 357 कोटी रुपये का वसूल करू नयेत, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. मिरज व सांगलीत येऊन पुण्याच्या तपास अधिकार्‍यांनी ही नोटीस बजावली.

फेब्रुवारी 2017 मध्ये आरगमध्ये गुटखा तयार कारखाना पुण्याच्या पथकाने सील केला होता. याप्रकरणी सध्या पथकाकडून करवाई सुरूच आहे. गेल्या वर्षभरापासून ही कारवाई सुरू आहे. या तपासादरम्यान गुटखा तयार करण्यासाठी आरग येथे येत असलेल्या साहित्य पुरवठादारांची माहिती पुढे आली होती. गुटख्याच्या पुड्या (रॅपर) या इंदूरमधून येत होत्या. या प्रकरणी पुण्याच्या पथकाकडून इंदूरमध्ये  भाजपच्या एका नेत्याची चौकशीही करण्यात आली होती. 

त्यानंतर या विभागाने मुसा जमादार याला अटक केली होती. त्याला न्यायालयात नेण्यापूर्वी त्याची प्रकृती बिघडल्याने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर त्याला सांगलीच्या कारागृहात पाठवण्यात आले. आज तपास अधिकार्‍यांनी त्याला कारागृहात जाऊन नोटीस बजावली. त्यानंतर फिरोज व फारूक या दोघांना नोटीस बजावण्यात आली. आरगमधील गुटखाप्रकरणी 357 कोटी रुपये का वसूल करू नयेत, याबाबत 30 दिवसांत म्हणणे मांडावे, असे त्या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.