Sun, Jul 21, 2019 01:28होमपेज › Sangli › मतभेद विसरुन शिवसेना वाढवा 

मतभेद विसरुन शिवसेना वाढवा 

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 7:55PMतासगाव  : प्रतिनिधी

शिवसेनेच्या आजी- माजी पदाधिकार्‍यांनी आपआपसांतील मतभेद बाजूला करुन एकत्रित काम करावे. नूतन पदाधिकार्‍यांनी  गावोगावी शाखा उभारणी करून पक्ष बळकट करण्याचे आवाहन शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी तासगाव येथे केले.सावळज (ता. तासगाव) येथील संदीप मस्के यांची शिवसेनेच्या  तालुका उपप्रमुखपदी निवड झाली आहे. तासगाव येथे संदीप मस्के यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी विभुते बोलत होते.  

विभुते म्हणाले,  पदाधिकार्‍यांनी पदाच्या माध्यमातून संघटना मजबूत करण्याचे काम करावे. तालुक्यात शिवसेना पक्ष वाढविण्याचे काम करावे. पक्षाची ताकद आम्ही शिवसैनिकांच्या पाठीशी उभी करू.  
नूतन तालुका उपप्रमुख संदीप  मस्के म्हणाले, पदाच्या माध्यमातून तालुक्यात  गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक अभियान राबवणार. पक्षाचे ध्येय आणि धोरणे जनतेपर्यंत पोहचवणार आहे.

यावेळी तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख गणेश खाडे, कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख दिनकर पाटील, तासगाव शहरप्रमुख संजय चव्हाण, कामगार सेनेचे सचिन चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. अमोल काळे यांनी आभारमानले.