Sun, Feb 17, 2019 07:04होमपेज › Sangli › द्राक्षबागायतदारांना चाळीस लाखांचा गंडा

द्राक्षबागायतदारांना चाळीस लाखांचा गंडा

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 11:25PMतासगाव : शहर प्रतिनिधी

तालुक्यातील एकोणीस द्राक्षबागायतदारांना तब्बल 39 लाख 59 हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याची तक्रार तासगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई, कर्नाटकच्या व्यापार्‍यांविरोधात तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विक्रमसिंह किसन पाटील (वय 35, रा. आळते, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पेश शेख, केसरजहाँ अल्पेश शेख (दोघेही रा. चिंचाळी, घनसोळी, मुंबई), जावेद अब्दुलखान (जनता कॉलनी, टुकाकूर, कर्नाटक), मणेर, नितीन फड, नसीम, जमाल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशा सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी :  विक्रमसिंह यांची आळते येथे चार एकर बाग आहे. दि. 10 फेब्रुवारी 2017 रोजी वरील सर्व संशयित व्यापारी त्यांची बाग पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी 207, 137 आणि 160 रुपये (प्रति चार किलो) असा दर ठरला होता. शंभर रुपये अनामत रक्‍कमही देण्यात आली.

त्यानंतर वेळोवेळी द्राक्षांचे क्रेट भरून नेण्यात आले. एकूण 28 हजार 116 किलो द्राक्षे नेल्यानंतर फक्‍त 3 लाख 70 हजार रुपये विक्रमसिंह यांना संबंधित व्यापार्‍यांनी दिले; मात्र उरलेले 9 लाख 30 हजार रुपये देण्यास चालढकल सुरू  केली.  विक्रमसिंह  सातत्याने फोनवरुन पैसे देण्याबाबत मागणी करीत होते. काही दिवसांनी त्यांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले.

दरम्यान याच व्यापार्‍यांनी कुमार बापूराव माळी , संपत हिंदुराव मोहिते (रा. आळते),  किरण संजय चव्हाण , सुभाष हणमंत शिंदे , मानसिंग बाबुराव जाधव (सर्व रा. बोरगाव), तानाजी दगडू खरमाटे , नितीन तुकाराम खरमाटे, सुनिल सर्जेराव खरमाटे ,बाबुराव भाऊ खरमाटे , बाजीराव आकाराम बंडगर , महादेव बाळासो चवदार,शरद बच्चाराम दौंड  (सर्व रा. वंजारवाडी), प्रकाश किसन पाटील , प्रकाश विलास शिंदे, रमेश सुभाष पाटील, महेश शिवाजी चव्हाण (सर्व रा. ढवळी), अमोल राजेंद्र पाटील (रा. बामणी),  कृष्णा बाबू पाटील (रा. लिंब)   या  शेतकर्‍यांची फसवणूक केली. की रक्कम सुमारे 30 लाख रुपये होते.पोलिस हवालदार एम.व्ही. डामसे तपास करीत आहेत.