Wed, Jun 26, 2019 11:36होमपेज › Sangli › ग्रंथोत्सवाकडे रसिकांनी फिरवली पाठ

ग्रंथोत्सवाकडे रसिकांनी फिरवली पाठ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

‘वाचाल तर वाचाल’ असे घोषवाक्य घेऊन येथील शांतिनिकेतनच्या आवारात शासनातर्फे भरविण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाला राजकीय व्यक्तिंबरोबर रसिकांनीही पाठ फिरवली. दुसरीकडे पुस्तकांच्या स्टॉलची संख्या कमी व पुस्तकांची संख्याही कमी असल्याने उत्साहावर पाणी पडले. शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांंना एकत्र करून कार्यक्रम पार पाडण्यात आला. 

जिल्हा ग्रंथालयाच्यावतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील 377 ग्रंथालयांना निमंत्रण देण्यात आले होते. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार होते. त्यासाठी सर्व आमदारांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु याचवेळी वाळव्यात मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने कोणीही ग्रंथोत्सवाकडे फिरकले नाही. ग्रंथदिंडीला महापौर हारुण शिकलगार, प्रा. वैजनाथ महाजन, सुभाष कवडे, प्रा. डॉ. संजय ठिगळे, ग्रंथालय अधिकारी विद्या डाडर, संजय डाडर, पांडुरंग सूर्यवंशी, गौतम पाटील, विठ्ठल मोहिते आदी उपस्थित होते.त्यानंतर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सुभाष कवडे यांच्याहस्ते झाले. यावेळी वैजनाथ महाजन, गौतम पाटील यांनी नाराजी व्यक्‍त केली. 

प्रभारी ग्रंथालय अधिकारी किरण पाटील यांनी स्वागत केले. रामचंद्र गलांडे यांनी आभार मानले. अखेर मुलांसमोर भाषण करुन उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडला.