Thu, Jul 09, 2020 06:16होमपेज › Sangli › शिवसेना 2 ; काँग्रेस आणि टायगर ग्रुपला प्रत्येकी 1 ठिकाणी यश

शिवसेना 2 ; काँग्रेस आणि टायगर ग्रुपला प्रत्येकी 1 ठिकाणी यश

Published On: May 29 2018 1:31AM | Last Updated: May 28 2018 8:14PMविटा : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यात झालेल्या चार ग्रामपंचायतीत निवडणुकीत शिवसेनेला दोन, राजधानी भेंडवडे आणि  देवनगर तर काँग्रेसला साळशिंगे व स्थानिक आघाडीला भेंडवडे अशा प्रत्येकी एका ठिकाणी यश मिळाले. सकाळी दहा वाजता प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार रंजना उंबरहंडे यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू. झाली. रामनगर येथे 1 जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे किरण जयवंत फुके यांनी विजय मिळवला.  राजधानी भेंडवडे येथे 7 पैकी 4 जागा व सरपंचपद मिळवत शिवसेनेने विजयी सलामी दिली. काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. शिवसेनेच्या कमल तुकाराम जानकर या सरपंचपदी विजयी झाल्या.

अन्य सदस्य : संजय तानाजी जानकर, रत्नाबाई तातोबा जानकर, पांडुरंग नामदेव जानकर, सिंधू हणमंत जानकर (बिनविरोध), वंदना शहाजी पाटील, इंदूबाई अशोक मदने, रेखा धनाजी पाटील.    

साळशिंगे येथे सत्तांतर करत काँग्रेसचे  सय्यद चाँद मुल्ला विजयी झाले.  काँग्रेसचे 7 तर शिवसेनेचे 2 सदस्य निवडून आले.

विजयी उमेदवार : सूर्यकांत शिवाजी काशीद, अरविंद कृष्णा जाधव, रुपाली अरुण गायकवाड, पांडुरंग सदाशिव यादव, शारदा मधुकर माने, सिंधुताई हणमंत जाधव, महेंद्र धनाजी पाटील, सिंधुताई चंद्रकांत जाधव, सारिका हणमंत कदम.देवनगर येथे  7  जागा बिनविरोध झाल्या होत्या. सरपंचपदासाठी  शिवसेनेच्या बबूताई मनोहर जंगम विजयी झाल्या.

सदस्य  : मंगेश दत्तात्रय पाटोळे, बेबीताई प्रकाश माने, कमल संतोष जाधव, उषा दिलीप पवार, सचिन नारायण शेंडे, रेवणसिद्ध रामचंद्र इंगळे, अनुबाई नामदेव घुले.

कळंबी येथे एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीत पूनम दीपक कांबळे  बिनविरोध निवडून आल्या होत्या. साळशिंगे येथील काँग्रेसच्या समर्थकांनी जल्लोष करत माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची भेट घेतली. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांनी आमदार अनिलराव बाबर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांची भेट घेतली. 

गावठाण भेंडवडे येथे टायगर ग्रुपची सत्ता

गावठाण भेंडवडे येथे टायगर ग्रुपचे जिल्हा संपर्कप्रमुख राजू जानकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने माजी समाजकल्याण सभापती किसन जानकर यांच्या पॅनेलवर धक्कादायक विजय नोंदवत राजकीय पटलावर पदार्पण केले आहे. राजू जानकर यांच्या मातोश्री लक्ष्मी नानासो जानकर या सरपंचपदी विजयी झाल्या.

अन्य सदस्य पदाचे विजयी उमेदवार असे : सिंधू मधुकर कांबळे, जगन्नाथ बाळू यादव, काजल आप्पासो पाटोळे, हणमंत बाळू जानकर, ममुला मुबारक मुलाणी, अमोल उत्तम जानकर, छाया नवनाथ जानकर, छाया संदीपान जानकर, सागर प्रल्हाद इंगळे. याठिकाणी टायगर ग्रुपच्या 4 जागा, शिवसेनेच्या 3 जागा तर काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या 2 जागा निवडून आल्या आहेत.