Tue, May 21, 2019 00:12होमपेज › Sangli › ग्रामपंचायत, प्रशासनकडील कर्मचार्‍यांच्या आज बदल्या

ग्रामपंचायत, प्रशासनकडील कर्मचार्‍यांच्या आज बदल्या

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 11:26PMसांगली : प्रतिनिधी

ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन विभागाकडील कर्मचारी बदल्यांसाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेत बदली पात्र कर्मचार्‍यांचे समुपदेशन होणार आहे. प्रशासकीय 26 व विनंती 100 बदल्या अपेक्षित आहेत. कक्षअधिकारी, अधीक्षक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, चालक, परिचर, स्त्री परिचर, स्वीपर, चौकीदार, व्रणोपचारक संवर्गातील बदल्यांसाठी शुक्रवारी सकाळी 11 ते 3 या वेळेत समुपदेशन होणार आहे. विस्तार अधिकारी (पंचायत), ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी दुपारी 3.30 ते 5 या वेळेत समुपदेशन होणार आहे. 

जिल्हा परिषदेकडील बांधकाम, छोटेपाटबंधारे, आरोग्य, महिला व बालकल्याण, वित्त, प्राथमिक शिक्षण कृषी विभागाकडील कर्मचारी बदल्यांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेत समुपदेशन झाले आहे. 4 प्रशासकीय व 49 विनंती बदल्या झाल्या आहेत.