Tue, Apr 23, 2019 09:53होमपेज › Sangli › आटपाडी तालुक्यात भाजप ; सेनेची सहा ग्रामपंचायतीवर सत्ता

आटपाडी तालुक्यात भाजप ; सेनेची सहा ग्रामपंचायतीवर सत्ता

Published On: May 29 2018 1:31AM | Last Updated: May 28 2018 10:41PMआटपाडी : प्रतिनिधी 

तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी सहा ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला. तर कँाग्रेसने दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.विभुतवाडीत भाजप-सेनेच्या संयुक्त आघाडीने सत्ता मिळविली.आटपाडीच्या सरपंच पदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेनेच्या वृषाली धनंजय पाटील यांनी भाजपच्या मनीषा आबासाहेब पाटील यांच्यावर दणदणीत मात करत सरपंचपद पटकाविले.तालुक्यातील पंधरा ग्रामपंचायतींसाठी आज तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.या निवडणुकीत भाजपने निंबवडे, काळेवाडी, मापटेळा, भिंगेवाडी, बनपुरी, मासाळवाडी या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.शिवसेनेने आटपाडीचे सरपंचपद आणि पुजारवाडी,करगणी, मिटकी, पिंपरी खुर्द,खांजोडवाडी या ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन्न केली.नेलकरंजी आणि मानेवाडी या ग्रामपंचायतीवर कँग्रेसने सत्ता मिळविली.विभुतवाडीत भाजप-सेनेच्या संयुक्त आघाडीने बाजी मारली.नेलकरंजीत,बनपुरी आणि मिटकीत सत्तांतर झाले.

आटपाडीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे पंधरा सदस्य बिनविरोध निवडुन आले होते.सरपंचपद आणि दोन सदस्यांसाठी निवडणुक लागली होती. सरपंच पदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत सेनेच्या वृषाली पाटील यांनी भाजपच्या मनिषा पाटील यांचा 681मतांनी दारुण पराभव केला.

थेट  निवडणुकीत निवडूण आलेले सरपंच  

आटपाडी-वृषाली धनंजय पाटील, करगणी-गणेश लक्ष्मण खंदारे
मापटेमळा-रघुनाथ रामचंद्र माळी, पिंपरी खुर्द-सुनिता नामदेव कदम,
विभुतवाडी-चंद्रकांत रामचंद्र पावणे, बनपुरी-सुनिता महादेव पाटील, 
खांजोडवाडी-रामदास दत्तात्रय सुर्यवंशी,भिंगेवाडी-बाळासाहेब हजारे, 
नेलकरंजी-बाबासो सुखदेव भोसले, काळेवाडी-सिताबाई किसन काळे,मासाळवाडी-सखुबाई महादेव तळे, मानेवाडी-अमोल विठ्ठल खरात, 
मिटकी-दादा दाजी कोळेकर,पुजारवाडी(आटपाडी)-मंगल दगडु मोटे
निंबवडे-नंदा शांताराम देठे